You are currently viewing सुख वेदनांचे

सुख वेदनांचे

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्माननीय सदस्य तथा संस्थापक अध्यक्ष महाकवी कालिदास प्रतिष्ठान पुणे लेखक कवी वि. ग. सातपुते लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*सुख वेदनांचे*

*************

खरंच आता असे वाटते

कां उगा शब्दांना गुंफावे

शब्दार्थ अनभिज्ञ आता

कशाला व्यक्त होत रहावे

 

ज्ञात झाले अज्ञात आता

हीच वेदना जीवा छळते

भावशब्दांची व्याकुळता

सांगा आज कुणा कळते

 

जखमाही अबोल झाल्या

मौन वेदनांचे कळू लागले

अधीर स्पंदने संथ जाहली

आज थांबावेसे वाटू लागले

 

हेच तर आज सत्य वास्तव

सभोवार सहज दिसू लागले

दान भाळीचेच झेलीत रहावे

गूढ मनःशांतीचे कळू लागले

***********************

*रचना क्र. १८१

*#©️वि.ग.सातपुते.(भावकवी )*

*📞 ( 9766544908 )*

प्रतिक्रिया व्यक्त करा