You are currently viewing नितेश राणे यांच्या विरोधात उबाठाची संदेश पारकर यांना उमेदवारी

नितेश राणे यांच्या विरोधात उबाठाची संदेश पारकर यांना उमेदवारी

कणकवली :

 

कणकवली विधानसभा मतदारसंघात भाजपाचे उमेदवार नितेश राणे यांच्या विरोधात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेने संदेश पारकर यांना उमेदवारी दिली आहे.

नितेश राणे यांच्या विरोधात उमेदवार कोण? अशी चर्चा होती. कणकवली मतदारसंघातून सतीश सावंत, सुशांत नाईक, अतुल रावराणे, संदेश पारकर इच्छुक होते. सतीश सावंत यांनी स्वतः माघार घेतली होती.

सुशांत नाईक यांनाच उमेदवारी मिळेल, अशी चर्चा असताना गुरुवारी मातोश्रीवरून संदेश पारकर यांची अधिकृत उमेदवारी जाहीर झाली.

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संदेश पारकर यांना एबी फॉर्म दिला. यावेळी मिलिंद नार्वेकर, माजी खासदार विनायक राऊत उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा