You are currently viewing प्रवेशामुळे रुसलेल्या,फुगलेल्या रुपेश राऊळ यांना  राजन तेली यांच्याकडून कितीची पैठणी मिळाली?

प्रवेशामुळे रुसलेल्या,फुगलेल्या रुपेश राऊळ यांना राजन तेली यांच्याकडून कितीची पैठणी मिळाली?

*महिला जिल्हाध्यक्षा अड.नीता कविटकर यांचा सवाल*

 

सावंतवाडी :

निवडणुका डोळ्यासमोर ठेवून साड्या वाटल्या नसून दसरा कार्यक्रमानिमित्त गोरगरीब महिलांना साड्या वाटण्यात आल्या होत्या. दीपक केसरकर यांनी आजच नाही तर आमदार नसल्यापासून ते सण, उत्सवांना मदत करतात. त्यामुळे नाहक केसरकर यांची बदनामी करण्यापेक्षा रूसलेल्या, फुगलेल्या उबाठा विधानसभा प्रमुख रुपेश राऊळ यांनी माजी आमदार राजन तेलींकडून कितीची ‘पैठणी’ घेतली ? या प्रश्नांचे उत्तर द्यावे असे आव्हान उबाठा शिवसेनेच्या महीला जिल्हाप्रमुख अँड. निता कविटकर यांनी दिले.

अँड. कविटकर म्हणाल्या, नुकताच माजी आमदार राजन तेली यांनी उबाठा शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी रुसून बसलेले रूपेश राऊळ यांना राजन तेली यांच्याकडून कितीची पैठणी मिळाली ? याचा त्यांनी खुलासा करावा. दीपक केसरकर यांच्यासह त्यांना काम केलेलं आहे. ते आजच नाही तर आमदार नसल्यापासून गोरगरीबांना वाटप करतात. त्यांचा सण आनंदात व्हावा यासाठी त्यांचा प्रयत्न असतो. याची जाण रूपेश राऊळ यांना असताना त्यांना केवळ राजकारण करू नये असा टोला शिवसेनेच्या महिला जिल्हाप्रमुख अँड निता सावंत यांनी हाणला.

दरम्यान, दीपक केसरकर हे घाबरणारे नेते नाहीत त्यामुळे राजन तेली व रूपेश राऊळ यांनी केसरकरांची कितीही बदनामी केली तरी केसरकर ते पुन्हा जिंकणार आहेत. लाडकी बहीण योजनेमुळे महिला एकनाथ शिंदे यांच्यासोबत असल्याने विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. राजन तेली, रूपेश राऊळ यांनी टीका करण्यापेक्षा महिला दिन, सण उत्सवात महिलांसाठी उपक्रम राबवावे असा सल्ला महिला तालुकाप्रमुख यशश्री सौदागर यांनी दिला. यावेळी जिल्हाप्रमुख अँड निता कविटकर, तालुकाप्रमुख यशश्री सौदागर, अमिता नाणोसकर, अनुराधा वराडकर, स्नेहा मुळीक, श्रावणी नाईक, प्रचिती कुबल, उत्कर्षा गांवकर, चैत्राली गावडे, स्नेहा कुडतरकर आदि उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा