उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या पहिल्या यादीत आमदार वैभव नाईक यांना स्थान मिळाल्यानंतर त्यांनी आज गुरुवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्याचे निश्चित केले. कुडाळ येथील अनंत मुक्ताई समोरील पटांगणार यावेळी सभा घेऊन रखरखत्या उन्हात घामाच्या धारा वाहत असताना देखील कुडाळ मालवणचे नागरिक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्यांची भाषणे ऐकत होती. सभा संपल्यानंतर कुडाळ शहरातुन मेन रोडने प्रांताधिकारी कार्यालयाकडे रॅली काढण्यात आली. या रॅलीमध्ये शिवसैनिकांनी अलोट गर्दी करून शहर भगवामय करून सोडले होते.
यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख संजय पडते, कणकवली विधानसभा प्रमुख सतीश सावंत, माजी आमदार परशुराम उपरकर, माजी जिल्हाप्रमुख भाई गोवेकर, काँग्रेस जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख, माजी मंत्री प्रवीण भोसले, राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष अमित सामंत, व्हिक्टर डांटस, प्रसाद रेघे, उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत, युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट,आमदार वैभव नाईक यांच्या पत्नी स्नेहा नाईक, शिवसेना महिला जिल्हाप्रमुख उपनेत्या जान्हवी सावंत, जिल्हाप्रमुख नीलम पालव, श्रेया परब,हरी खोबरेकर, राजन नाईक, बबन बोभाटे,मंदार केणी, यतीन खोत, अभय शिरसाट, सुशांत नाईक, कन्हैया पारकर, अतुल बंगे, सचिन कदम, बाळा कोरगावकर, अनुप नाईक,किरण शिंदे, संतोष शिरसाट, गणेश कुडाळकर तपस्वी मयेकर, संमेश परब, शिल्पा खोत, उदय मांजरेकर, योगेश धुरी, मंदार ओरसकर, पूनम चव्हाण, दीपा शिंदे, स्नेहा दळवी, मथुरा राऊळ,सुशील चिंदरकर, नितीन वाळके,श्रेया गवंडे आदींसह शिवसेनेचे सर्व पदाधिकारी, शिवसैनिक व महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते कुडाळ मालवणची जनता हजारोंच्या संख्येने उपस्थित होती.
जोरदार शक्ती प्रदर्शनानंतर आमदार वैभव नाईक यांनी कुडाळ प्रांत कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल केला.