सुवर्ण महोत्सवी योजनेअंतर्गत अनुदान घेणाऱ्याbशहीद जवानांच्या पत्नी हयातीचा दाखल सादर करण्याचे आवाहन
सिंधुदुर्गनगरी
सुवर्ण महोत्सवी योजनेअंतर्गत अनुदान घेणाऱ्या शहीद जवानांच्या पत्नी यांनी दरवर्षीप्रमाणे त्या हयात असल्याबाबतचा दाखला संबंधित बँक, सरपंच, ग्रामसेवक यांच्याकडून सही व शिक्यासह प्राप्त करुन घेऊन त्यासोबत माजी सैनिक विधवा पत्नी ओळखपत्र व बँक पासबुकच्या छायांकीत प्रतीसह या कार्यालयात दिनांक 20 नोव्हेंबर 2024 पर्यत सादर करण्याचे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी केले आहे.
जिल्ह्यातील 7 शहीद जवानांच्या पत्नी यांना सुवर्ण महोत्सवी योजनेअंतर्गत जिल्हा सैनिक कार्यालय,सिंधुदुर्ग यांच्याकडून दरमहा अनुदान अदा करण्यात येते. या लाभार्थी हया वयोवृध्द असल्याने शासनाच्या नियमानुसार वर्षातून प्रत्येक सहा महीन्याने दि. 31 मे व 30 नोव्हेंबर हयातीचे दाखले घेऊनच अनुदान अदा करण्याचे निर्देश आहेत.
हयातीचे दाखले दिलेल्या मुदतीत या कार्यालयास प्राप्त न झाल्यास दिनांक 1 डिसेंबर 2024 पासून त्यांचे मासिक अनुदान दाखला प्राप्त होईपर्यंत तात्परत्या स्वरुपात स्थगित करण्यात येईल यांची नोंद घ्यावी. अधिक माहितीसाठी या कार्यालयाचा दुरध्वनी क्र.02362 228820,9322051284 वर संपर्क करावा.