सावंतवाडी :
नॅशनल असोसिएशन फॉर दी ब्लाईंड सिंधुदुर्ग भटवाडी-सावंतवाडी येथे पांढरी काठी दिनानिमित्त २६ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता नॅब नेत्र रुग्णालयाच्या पहिल्या मजल्यावर दृष्टिबाधितांचा स्नेहमेळावा आयोजित केला आहे.
या स्नेहमेळाव्याकरिता महाराष्ट्र व गोवा बार असोसिएशन अध्यक्ष ॲड. संग्राम देसाई प्रमुख पाहुणे व अध्यक्ष म्हणून उपस्थित राहणार आहेत. सिंधुदुर्ग जिल्हयातील सर्व दृष्टिबाधितांनी या कार्यक्रमाकरिता उपस्थित राहवे. गरजू दृष्टिबाधितांना पांढरी काठी प्रदान करण्यात येणार आहे. कार्यक्रमाला येताना दृष्टिबाधितांनी आपली जुनी काठी घेऊन येणे आवश्यक आहे.
सर्व नेत्रबाधित लाभार्थ्यांनी या कार्यक्रमाकरिता अवश्य उपस्थित राहवे, असे आवाहन नॅबचे अध्यक्ष अनंत उचगांवकर व सेक्रेटरी सोमनाथ जिगजिन्नी यांनी केले आहे.