You are currently viewing महाकवी कालिदास प्रतिष्ठान पुणेच्या मासिक काव्यसंमेलनाची मुहूर्तमेढ

महाकवी कालिदास प्रतिष्ठान पुणेच्या मासिक काव्यसंमेलनाची मुहूर्तमेढ

पुणे :

पुण्यातील साहित्यातील महाकवी कालिदास प्रतिष्ठान तर्फे दरमहा काव्यसंमेलन घेण्याची संकल्पना आज २२ ऑक्टोंबर २०२४ रोजी उद्यान प्रसाद कार्यालयाच्या सभागृहात कार्यरत झाली. या प्रसंगी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक मा. वि.ग.सातपुते यांनी नवीन कार्यकारिणी सर्वानुमते जाहीर केली. कार्याध्यक्ष मा. काकासो चव्हाण ,उपाध्यक्ष. डॉ. महेंद्र ठाकुरदास व ऍड. संध्या गोळे , सचिव ऋचा कर्वे , सहसचिव सौ. राधिका दाते , कार्यवाह मा. यशवंत देव , कोषाध्यक्ष , मा. मकरंद घाणेकर व सौ. वंदना घाणेकर. तर सल्लागार व मार्गदर्शक म्हणुन गुरुवर्य डॉ.न.म. जोशी , प्रा. सू. द. वैद्य , डॉ. राजेंद्र पडतुरे ( बेंगलोर ) यांची निवड करण्यात आली.

याप्रसंगी प्रास्ताविक करताना ज्येष्ठ साहित्यिक व भावकवी वि.ग.सातपुते यांनी महाकवी कालिदास प्रतिष्ठान पुणे या संस्थेच्या आतापर्यंतच्या कार्यकालावधीचा एकूण आढावा घेवून संस्थेच्या पुढील उद्दिष्टांची संकल्पना सांगितली.

सर्व कार्यकारीणीचे सत्कार झाल्यावर खालील उपस्थित कवींचे उत्स्फुर्त काव्यसादरीकरण झाले. त्यामध्ये सौ मृणाल जैन, सौ.मीनाताई सातपुते, शर्मिला कुलकर्णी, सौ. राजश्री सोले, विजय सातपुते, प्रिया दामले, प्रतिभा पवार, किरण जोशी, बाबा ठाकूर, राहूल भोसले, अंजली महाजन, सौ .जयश्री श्रोत्रीय, हेमंत केतकर, मकरंद कुलकर्णी, सुधीर कुबेर, सौ.जयश्री देशकुलकर्णी, मकरंद घाणेकर, वंदना घाणेकर, यशवंत देव, संध्याताई गोळे, सौ. राधिका दाते, सौ. मिनाक्षीताई नवले, सौ.दाक्षायणी पंडीत, अनील, कुलकर्णी, सौ.साधना शेळके, सौ. प्रतिभा सावंत, मधुकर निलेगावकर, सौ.मधुरा कर्वे, जगदीप वनशिव, राम सर्वगोड, बंडोपंत जोशी, शिवाजी उराडे, जयंत भिडे, किरण जोशी, सुरेश शेठ, डॉ. लक्ष्मण शिवणेकर, डॉ. महेंद्र ठाकुरदास, ऍड. संध्या गोळे, जयश्री श्रीखंडे, त्र्यंबक बोरीकर, विजय जाधव, गणपत तरंगे, मृणाल गोसावी, सुजाता भडभडे, मनीषा आवेकर, ऋचा कर्वे तसेच वि. ग. सातपुते यांचे काव्य सादरीकरण झाले.

कार्यक्रमाचे सूत्र संचालन ऋचा कर्वे यांनी केले व सौ. राधिका दाते यांनी आभारप्रदर्शन केले. कोजागिरी निमित्ताने दुग्धपान होवुन कार्यक्रमाची सांगता झाली.

प्रतिक्रिया व्यक्त करा