पांढरी काठी दिनानिमीत्त शनिवारी २६ रोजी दृष्टीबाधितांच्या स्नेह मेळाव्याचे सावंतवाडी आयोजन
सावंतवाडी
नॅशनल असोसिएशन फॉर दी ब्लाईंड सिंधुदुर्ग
भटवाडी, तालुका सावंतवाडी येथे पांढरी काठी दिनानिमीत्त शनिवार दि. २६ ऑक्टोबर २०२४ रोजी सकाळी ११ वाजता नॅब नेत्र रुग्णालयाच्या पहिल्या मजल्यावर दृष्टीबाधितांचा स्नेह मेळावा आयोजीत केला आहे. या स्नेह मेळाव्याकरीता म्हणून ॲड. मा. श्री. संग्रामजी देसाई, कुडाळ, (महाराष्ट्र व गोवा बार असोसिएशन अध्यक्ष) प्रमुख पाहुणे व अध्यक्ष म्हणून लाभले आहेत. तरी सिंधुदुर्ग जिल्हयातील सर्व दृष्टीबाधितांनी या कार्यक्रमाकरीता आवर्जून उपस्थित रहावे. गरजू दृष्टीबाधितांना पांढरी काठी प्रदान करण्यात येईल. कार्यक्रमाला येताना दृष्टीबाधितांनी आपली जुनी काठी घेऊन येणे आवश्यक आहे.
तरी सर्व नेत्रबाधित लाभार्थ्यांनी या कार्यक्रमाकरीता अवश्य उपस्थित रहावे असे आवाहन नॅब चे सेक्रेटरी श्री. सोमनाथ जिगजीन्नी व अध्यक्ष श्री. अनंत उचगांवकर यांनी केले आहे.