You are currently viewing प्रबोधनात्मक काव्यमैफिलीला रसिकांचा उस्फुर्त प्रतिसाद नवरात्री महोसत्वा मार्फत काव्य मैफिलीचे यशस्वी आयोजन

प्रबोधनात्मक काव्यमैफिलीला रसिकांचा उस्फुर्त प्रतिसाद नवरात्री महोसत्वा मार्फत काव्य मैफिलीचे यशस्वी आयोजन

प्रबोधनात्मक काव्यमैफिलीला रसिकांचा उस्फुर्त प्रतिसाद
नवरात्री महोसत्वा मार्फत काव्य मैफिलीचे यशस्वी आयोजन

छत्रपती संभाजीनगर- विविध परंपरा, सण , उत्सव लाभलेल्या आपल्या भारत देशात अनेक सण उत्सवा निमित्त सर्वजन एकत्र येऊन सामाजिक एकात्मतेचा आदर्श देशात पेरतात. याच विचाराने प्रेरित होऊन छत्रपती संभाजी नगर शहरातील विविध नवरात्र उत्सव मंडळांनी विविध सामाजिक उप‌क्रमाचे आयोजन केले. यात प्रामुख्याने आपल्या कवितांतून समाजिक प्रबोधन करण्याऱ्या काव्यस्पंदन समुहाने सर्वांचे लक्ष वेधले आहे. दिं 04 ऑक्टोबर ते 11 ऑक्टोबर दरम्यान छत्रपती संभाजीनगर येथील 1) शारदा माता नवरात्री उत्सव, संघर्ष नगर, N-2 सिडको 2) शुभश्री कॉलनी, N-6 सिडको 3) नवदुर्गा नवरात्र उत्सव मंडळ, नवजीवन कॉलनी, हाडको 4) राजे शिवछत्रपती नवरात्र उत्सव मंडळ, बजाज नगर येथे काव्यामैफिल पार पडली.

खर तर कवी हा वास्तविकता दर्शवून समाजाला आरसा दाखवण्याचे काम करतो.याच वैचारिक दृष्टीने हा काव्यस्पंदन समुह छत्रपती संभाजीनगर शहरात आपल्या कवितांमधुन विचारांचा जागर करत आहे. समाजातील विविध स्तरांतून या समुहातीत सर्व कविंचे स्वागत तसेच अभिनंदन होत आहे. या काव्यमैफिली मध्ये कवी प्रा.डॉ सुशिल सातपुते, कवी श्री.विजयकु‌मार पांचाळ,कवी श्री.आर. पी शिखरे, कवी सौ.सुनिता कपाळे, कवी श्री.दिपक नागरे, कवि श्री.संदेश वाघमारे यांनी आपल्या रचनांनी श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.
समाजातील वाढती व्यसनाधिनता, महिलला वरील अत्याचार , महागाई, बेरोजगारी, दुरावत चाललेली नाती , वाईट चालीरिती या विषयांवर आधारित रचनांनी उत्कृष्ट प्रबोधन करण्याचे काम या काव्य मैफिली मार्फत केले जात आहे. खर तर अशा आयोजनांची समाजाला नितांत गरज आहे , जेणेकरून समाजाचे सामाजिक स्वास्थ सुदृढ होण्यास बळ मिळेल.

सामाजिक आशया बरोबरच नाती, शेती माती, हुंडाबळी आणि धार्मिक कवितांनी श्रोत्यांच्या हृद‌याचा ठाव घेतला. सर्वच ठिकाणी कवितांना श्रोत्यांनी भरभरून दाद दिली यात सौ.सुनिता कपाळे यांची ‘बाप’ ही रचना, कवी आर. पी. शिखरे यांची मुलगी आणि वडीलांच नात सांगणारी ‘लेक’ ही रचना, कवी दिपक नागरे यांची ‘बहीण ‘ ही रचना कवी. संदेश वाघमारे यांची ‘खंत’ ही रचनानी प्रेक्षकांची मने जिंकली. याच बरोबर कवी डॉ.सुशिल सातपुते यांची ‘बरं झालं बाप्पा’ ही रचना आणि कवी श्री.विजय कुमार पांचाळ यांच ‘भक्षक’ ही रचना समाजातील वास्तव परिस्थिती दर्शवणारी ठरली.अशा उपक्रमांना समाजानेही पाठबळ दिले पाहिजे. जेणेकरून समाजात नवा आदर्श पेरला जाईल आणि एक विचारशिल पिढी घडवण्यास मदत होईल. या प्रबोधनात्मक काव्य मैफिलीचे बहारदार सूत्रसंचालन कवी प्रा. डॉ. सुशिल सातपुते आणि कवी श्री. विजयकुमार पांचाळ यांनी केले.या प्रबोधनात्मक काव्य मैफिलीचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा