You are currently viewing मुक्ताई ॲकेडमीच्या विदयार्थ्यांची विभागीय स्तरावर झेप
यशस्वी विदयार्थ्यांसोबत कौस्तुभ पेडणेकर सर

मुक्ताई ॲकेडमीच्या विदयार्थ्यांची विभागीय स्तरावर झेप

सावंतवाडी :

क्रीडा संचालनालय, पुणे आणि जिल्हा क्रीडाधिकारी, सिंधुदुर्ग यांच्यातर्फे घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय शालेय कॅरम आणि बुदधिबळ स्पर्धेत दरवर्षीप्रमाणे या वर्षीदेखील मुक्ताई ॲकेडमीच्या विदयार्थ्यांनी बाजी मारली. कॅरम स्पर्धेत मुक्ताई ॲकेडमीच्या साक्षी रामदुरकर, स्मित सावंत, आस्था लोंढे आणि बुदधिबळ स्पर्धेत साक्षी रामदुरकर, गार्गी सावंत, किमया केसरकर, यथार्थ डांगी या विदयार्थ्यांनी यश मिळवले. या सर्व विदयार्थ्यांची विभागस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या स्पर्धेतुन पुढे राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर विदयार्थ्यांची निवड केली जाणार आहे.

साक्षी रामदुरकर सलग तीन वर्षे कॅरम आणि बुदधिबळ स्पर्धेत विभागीय स्तरावर निवड होणारी कोकणातील एकमेव खेळाडू ठरली आहे. साक्षी राष्ट्रीय कॅरम खेळाडू आहे. विशेष म्हणजे ॲकेडमीच्या इतर विदयार्थ्यांनी हे यश पहिल्याच प्रयत्नात मिळवले आहे. चौदा वर्षे वयोगट कॅरम स्पर्धेत मुलींमध्ये साक्षी रामदुरकर प्रथम, आस्था लोंढे द्वितीय, मुलांमध्ये स्मित सावंत प्रथम. चौदा वर्षे वयोगट बुदधिबळ स्पर्धेत मुलींमध्ये साक्षी रामदुरकर तृतीय, गार्गी सावंत चौथी, मुलांमध्ये यथार्थ डांगी चौथा, सतरा वर्षे वयोगट बुदधिबळ स्पर्धेत मुलींमध्ये किमया केसरकर चौथी

मागील दहा वर्षे ॲकेडमीच्या विदयार्थ्यांनी कॅरम व बुदधिबळ खेळांमध्ये जिल्हा ते राष्ट्रीय स्तरावर अनेक पारितोषिके मिळवली आहेत. मुक्ताई ॲकेडमी राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर “बेस्ट ॲकेडमी” पुरस्कार मिळवणारी कोकणातील एकमेव ॲकेडमी आहे. ॲकेडमीचे सोळा विदयार्थी आंतरराष्ट्रीय मानांकन प्राप्त बुदधिबळपटू आहेत. चार राष्ट्रीय पारितोषिक प्राप्त आणि आठ राज्यस्तरीय पारितोषिक प्राप्त कॅरमपटू आहेत. या सर्व विदयार्थ्यांना मुक्ताई ॲकेडमीचे अध्यक्ष आणि प्रशिक्षक श्री.कौस्तुभ पेडणेकर सर यांनी मार्गदर्शन केले आहे. सर्व स्तरावरुन विदयार्थ्यांचे कौतुक करण्यात येत आहे.

 

यशस्वी विदयार्थ्यांसोबत कौस्तुभ पेडणेकर सर

प्रतिक्रिया व्यक्त करा