You are currently viewing प्रकाश केसरकर ज्योतिष वास्तू भूषण पदवीने सन्मानित

प्रकाश केसरकर ज्योतिष वास्तू भूषण पदवीने सन्मानित

सावंतवाडी :

 

मळगाव इंग्लिश स्कूल मधील संगीत कला विषयातील शिक्षक श्री प्रकाश वासुदेव केसरकर यांना पुण्यातील ज्योतिष वास्तु विश्व संशोधन केंद्र यांच्याकडून वास्तु विषारद, वास्तू भूषण व इयर ऑफ द अचीवमेंट पदवी देऊन गौरविण्यात आले.

ज्योतिष वास्तु विश्व संशोधन केंद्र, पुणे यांच्यावतीने २० ऑक्टोबर रोजी विणकर सभागृह येथे ज्योतिष वास्तु विश्व केंद्रातील विविध कोर्समध्ये उत्तीर्ण झालेल्या व्यक्तींना पदवी प्रदान करण्यात आली. वास्तु विशारद, वास्तु रत्न, वास्तुभूषण आणि लोलक विशारद, अंक विशारद यांसारख्या कोर्समध्ये प्रवेश घेऊन यशस्वीरित्या आपले वर्ग पूर्ण करून घेतल्या गेलेल्या परीक्षेमध्ये घवघवीत यश मिळविलेल्या सर्व विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व ट्रॉफी देऊन त्यांच्या सन्मान करण्यात आला. श्री केसरकर यांना ज्योतिष वास्तुशास्त्रातील अथक मेहनतीचे योग्य फळ मिळाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा