You are currently viewing २३ ऑक्टोबर रोजी तळवडे येथे स्वर्गीय प्रकाश परब स्मृतिदिना निमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन 

२३ ऑक्टोबर रोजी तळवडे येथे स्वर्गीय प्रकाश परब स्मृतिदिना निमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन 

सावंतवाडी :

स्वर्गीय प्रकाशदादा परब यांच्या ६ व्या स्मृतिदिना निमित्त “प्रकाश परब मित्रमंडळ, तळवडे” आणि “ऑन कॉल रक्तदाते संस्था, सिंधुदुर्ग” यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार दि. २३ ऑक्टोबर २०२४ रोजी सकाळी ०९:०० ते दुपारी ०१:०० या वेळेत प्रकाश परब मित्रमंडळ, तळवडे गेट ता. सावंतवाडी जि.सिंधुदुर्ग येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. तरी रक्तदात्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून रक्तदान करून हे रक्तदान शिबीर यशस्वी करण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन ऑन काॅल रक्तदाते संस्था, सिंधुदुर्ग” कार्यकारिणीचे अध्यक्ष मा. दयानंदजी गवस सर, उपाध्यक्षा मा. मीनल सावंत मॅडम् आणि कार्यकारिणीमार्फत करण्यात आले आहे. रक्तदानासाठी येणार्‍या रक्तदात्यांनी संपर्क करण्याचे आवाहन केले आहे. जेणे करून जाण्यायेण्याचे नियोजन करण्यात येणार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा