You are currently viewing विधानसभा निवडणुकीच्या रिंगणातून सतीश सावंत यांची माघार

विधानसभा निवडणुकीच्या रिंगणातून सतीश सावंत यांची माघार

कणकवली :

 

कणकवली विधानसभा मतदार संघातून आम्ही चौघेजण इच्छुक होतो. तसेच मी सावंतवाडीतूनही इच्छुक होतो. मात्र तेथे राजन तेली यांचा प्रवेश झाला आहे. त्यामुळे या निवडणुकीत मी तुर्त थांबण्याचा निर्णय घेतला आहे. कणकवली मतदारसंघातून इच्छुक असलेल्या जिल्हाप्रमुख संदेश पारकर, विधानसभा संपर्कप्रमुख अतुल रावराणे, युवा सेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांच्यापैकी ज्या उमेदवाराला पक्ष तिकीट देईल त्याचा प्रचार करण्याचा निर्णय मी घेतला आहे. पक्ष देईल तो उमेदवार निवडून आणण्यासाठी आपण अहोरात्र मेहनत करणार असून येत्या दोन दिवसात पक्षाच्या उमेदवाराचे नाव जाहीर होईल अशी माहिती उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे विधानसभा प्रमुख सतीश सावंत यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी कन्हैया पारकर उपस्थित होते. उद्या २२ ऑक्टोंबरला भगवती मंगल कार्यालय येथे माजी आमदार परशुराम उपरकर आणि राजन तेली यांचा कणकवली शिवसेनेतर्फे भव्य सत्कार होणार असल्याचीही माहिती सतीश सावंत यांनी दिली.

प्रतिक्रिया व्यक्त करा