*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्माननीय सदस्य कवी विनायक जोशी लिखित अप्रतिम चित्रकाव्य*
*लक्ष ठेवती “लक्षा” वरती*
तारीख गेली जाहीर होऊन
सुरू जाहली आचारसंहिता
निर्बंध आले *पक्षांवरती*
उड्या मारतील उंदीर आता
दारी बसविले बाउंसर दोन
*लक्ष ठेवती “लक्षा” वरती*
टप्यात येता “पिस्तूल धारी”
झडप घालतात त्याचेवरती
नाही बाळगत क्षमा मुळीच
लोळवती उंदीर मामा सारखे
नसतो हिशोब *दया क्षमेचा*
करून टाकतात जीवा पारखे
देऊन शिक्षण *वर्ष भराचे*
करतात त्यांना *ट्रेन्ड* असे
नाही जात कुणी *वाटेला*
शिक्षण असते दिले “खासे”
असूदे कुठल्या बड्या गॅंगचा
तुटून पडतात असे झकास
अद्दल घडवून जीवास मुकतो
मिळत नाही घ्यायला “श्वास”
विनायक जोशी ✍️ठाणे
मीलनध्वनी/९३२४३२४१५७