*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्माननीय सदस्य कवी बाबा ठाकूर लिखित अप्रतिम काव्यरचना*
*शेवटचे….. क्रियाकर्म !!*
मरणापूर्वी आधीच सारी
तयारी करून घेतली
सातबाराची माझी कागद
पेटत्या चुलीत घातली
मीच माझी लाकडं
आधी विकत घेतली
भट्टीची पांढरी चादर
देहावर ओढून घेतली
जगण्यात गोंधळ झाला
मरतांना मात्र नको
माझ्या श्राद्धाचं आमंत्रण
कपटी कावळयांना नको ..!
आयुष्यभर ज्यांनी छळलं
त्यांची छि:थू.. करतो
मढ्यावरून जातांना त्यांना
शिव्या देवून …जातो..
इतकी वर्ष साचलेलं
शिव्याशाप..टेप करून ठेवलं
भाषण माझं…जाळल्यावर
नतद्रष्टांना वाजवायला लावलं
शीघ्र क्रियाकर्म माझं
मीच उरकून घेतला
शिव्यांची लाखोली वाहून
जगाला निरोप दिला
सगेसोयरे रक्ताचे माझे
मेल्यावरही..हरामखोरांनो भेटू नका
पिशाच्च होऊन छळालं
वरतीही…मला दिसू नका…!!!
बाबा ठाकूर