You are currently viewing प्रीत कुसुमसुमनी

प्रीत कुसुमसुमनी

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्माननीय सदस्य तथा संस्थापक अध्यक्ष महाकवी कालिदास प्रतिष्ठान पुणे लेखक कवी वि. ग. सातपुते लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*प्रीत कुसुमसुमनी*

****************

 

छबी तुझी लोचनी तरळता

पापण्यात प्रतिबिंब डहुळते

साक्षात गूढ ते प्रीतभावनांचे

अलवार अंतरातुनी पाझरते….

 

संगती सडे प्राजक्ती फुलांचे

कुसुमसुमना प्रीती गंधाळते

तू अशी सुंदराच मनराऊळी

भावशब्दी गीतातुनी प्रसवते….

 

निळाई नीलकांती निलांबरी

मुरलीधरी मुग्ध बासुरी घुमते

छबी तुझीच लोचनी तरळता

पापण्यात प्रतिबिंब डहुळते….

**********************

*रचना क्र १७७*

*©️वि.ग.सातपुते.(भावकवी )*

*📞 ( 9766544908 )*

प्रतिक्रिया व्यक्त करा