*आनंदीबाई रावराणे महाविद्यालयास सुवर्णपदक*
*वैभववाडी*
मुंबई विद्यापीठ आयोजित ॲथलेटिक्स स्पर्धा क्रीडा संकुल, मुंबई विद्यापीठ येथे दिनांक १९ ऑक्टोबर २०२४ रोजी पार पडल्या. यामध्ये आयोजित ५ किमी धावण्याच्या स्पर्धेत वैभववाडी येथील महाराणा प्रतापसिंह शिक्षण संस्था मुंबई संचलित आनंदीबाई रावराणे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील प्रथम वर्ष कला शाखेचा विद्यार्थी कु. सुहास मारुती र्हायकर याने प्रथम क्रमांक पटकावत सुवर्ण पदक मिळवले.
त्याला जिमखाना विभाग प्रमुख प्रा.सचिन पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.
या उल्लेखनीय कामगिरी बद्दल संस्था पदाधिकारी, प्राचार्य, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.