You are currently viewing बांदा केंद्र शाळेत लोकसहभागातून साकारलेल्या किचनशेडचा लोकार्पण सोहळा संपन्न

बांदा केंद्र शाळेत लोकसहभागातून साकारलेल्या किचनशेडचा लोकार्पण सोहळा संपन्न

*बांदा केंद्र शाळेत लोकसहभागातून साकारलेल्या किचनशेडचा लोकार्पण सोहळा संपन्न*

*बांदा*-

बांदा येथील पीएम श्री जिल्हा परिषद केंद्र शाळेच्या परिसरात लोकसहभागातून साकारलेल्या किचशेडचा लोकार्पण सोहळा शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रत्नाकर आगलावे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.
स्वर्गीय प्रणव रमेश मठकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ उभारण्यात आलेल्या या किचन शेड साठी रमेश महदेव मठकर व सीमा मठकर या उभयतांनी किचन शेड उभारणीसाठी आर्थिक स्वरूपात मदत उपलब्ध करून दिली होती.
बांदा केंद्रशाळेतील किचनशेडची दुरावस्था झाली होती या ठिकाणी नवीन किचन शेड उभारण्याचा संकल्प पालकांनी केला होता.या किचनशेडची उभारणी झाल्यानंतर ही किचनशेड शाळेकडे हस्तांतरण करण्यात आले.यावेळी बांदा सरपंच प्रियांका नाईक, मुख्याध्यापक शांताराम असनकर,शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष संपदा सिध्दये,शाळा व्यवस्थापन समिती सदस्य हेमंत मोर्ये,माजी मुख्याध्यापिका उर्मिला सावंत मोर्ये, उमांगी मयेकर,संतोष बांदेकर,अरूण मोर्ये, अनुराधा मोर्ये, बाळकृष्ण सावंत,शीला सावंत,मेघा गवस,सतिशचंद्र मोर्ये, सुप्रिया सावंत,रुपाली सावंत, नवनाथ चारी,अरूण पाटकर, अश्विनी पाटकर,राजन कुबडे, ज्ञानेश्वर वारंग आदि मान्यवर उपस्थित होते. मठकर कुटुंबियांनी केलेल्या सहकार्याबद्दल शाळेचा वतीने‌ शाल ,श्रीफळ‌ व मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला.शाळेच्या परिसरात उभारण्यात आलेल्या या किचन शेड बद्दल पालक वर्गातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा