You are currently viewing मोफत नेत्रतपासणी शिबीर संपन्न 

मोफत नेत्रतपासणी शिबीर संपन्न 

श्री. रामेश्वर माऊली शेतकरी गट, शेतकरी मंडळ, घावनळे व नॅब नेत्ररुग्णालय, सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने घावनळे येथे मोफत नेत्रतपासणी शिबीर संपन्न

कुडाळ

श्री. रामेश्वर माऊली शेतकरी गट, शेतकरी मंडळ, घावनळे व नॅब नेत्ररुग्णालय, सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने घावनळे येथे दि. १९/१०/२०२४ रोजी मोफत नेत्र तपासणी शिबीर घेण्यात आले. सुरुवातीला दिपप्रज्वलाने उद्घाटन करण्यात आले . संस्था सचिव श्री. सोमनाथ जिगजिन्नी यांनी नॅब संस्थेची माहिती दिली. अध्यक्ष श्री अंनत उजगांवकर यांनी नेत्रतपासणी शिबीरांच्या आयोजनाची आवश्यकता अगदी मोजक्या शब्दात व खेळीमेळीच्या वातावरणात सांगीतली. सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत शिबीर चालले याचा ६८ लाभार्थीनी लाभ घेतला. सवलतीच्या दरात चष्माचे वाटप करण्यात आले. मोतीबिंदू बऱ्याच जणांना आहे असे निदर्शनास आले. या शिबीरासाठी श्री. रामेश्वर माऊली शेतकरी गट व नॅब नेत्ररुग्णालय, सांवतवाडी यांनी विशेष मेहनत घेतली.

प्रतिक्रिया व्यक्त करा