You are currently viewing राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची सभा ‌सावंतवाडीत ‌संपन्न

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची सभा ‌सावंतवाडीत ‌संपन्न

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची सभा ‌सावंतवाडीत ‌संपन्न

सावंतवाडी

राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी सावंतवाडी विधानसभा मतदार संघाची प्रमुख पदाधिकाऱ्यांची तातडीची बैठक दिनांक 20/90/2४ रोजी सावंतवाडी येथे पक्ष कार्यालयात ठिक सकाळी ११ वाजता घेणेत आली. सदर सभेत श्री.ऑगस्टीन फर्नांडीस, (सावंतवाडी) अंथोनी डिकुन्हा (झिरंगवाडी) अलेक झांडर डिसोजा (कोलगाव स्टँड) स्टँडी डिकुल्हा (झिरंगवाडी) लुईस डिसोजा (माजगाव) या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा पक्षात प्रवेश घेण्यात आला, त्याचबरोबर दोडामार्ग, सावंतवाडी व वेंगुर्ला विधानसभा मतदार संघातील ‘पदाधिकाऱ्यांची खास सभा, सावंतवाडी विधान प्रमुख सभा मतदारसंघाचे समन्वयक तथा प्रदेश चिटणीस श्री सुरेश गवस व दुसरे प्रदेश चिटणीस श्री. एम के गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आली.
सावंतवाडी विधानसभा मतदार संघातील कार्यकर्त्यांच्या भावना ऐकून घेण्यासाठी ही सभा आयोजीत करण्यात आली होती त्यावेळेस तिन्ही तालुकाध्यक्ष श्री उदयराव भोसले (सावंतवाडी) श्री सत्यवान गवस (दोडामार्ग) श्री संदीप पेडणेकर (वेंगुर्ला) जिल्हाउपाध्यक्ष श्री एम डी सावंत इत्यादीची पदाधिकाऱ्यांनी मागिल लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळी ‌ मिळालेल्या‌‌ वाईट वागणूकीच्या अनुभवामुळे आपल्या भावना सभेत व्यक्त केल्या. पोटतिडकीने काम करून सुद्धा म्हणावी तशी दखल घेतली गेली नाही. तसेच येणाऱ्या विधानसभा मतदार संघा साठी महायुतिच्या उमेदवाराचा जरूर प्रचार करू पण कार्यकत्यान व पदाधिकाऱ्यानी या वेळेला दिलेला शब्द निवडून आलेल्या उमेदवाराने पाळला पाहिजे. याची शहानिशा प्रचार करायच्या आधी करायची आहे. त्यानंतर प्रचाराला सुरुवात करू असा समनुमते निर्णय घेणेत आलेला आहे.

आमच्या बरोबर सन्मानाने वागा उमेदवाराने दिलेला शब्द पाळावा एवढीच समस्त कार्यकर्त्याची भावना आहे, त्या संदर्भात सावंतवाडी विधानसभा मतदार संघ समन्वयक तथा प्रदेश सरचिटणीस श्री सुरेश गवस व जेष्ठ नेते एम के गावडे जिल्हाध्यक्ष व वरीष्ठांशी बोलल्यानंतरच प्रचारात सहभागी असा निर्णय घेण्यात आलेला आहे.

या सभेस सत्यजीत देशमुख, शफीक खान, असीम शेक, अशोक पवार, संदीप राणे, विजय कदम, रामचंद्र सावंत, रिश्दी परब, रंजना, निर्मल विलास पावस्कर, दिपक देसाई, ‌ प्रकाश गावडे, दिपक ‌ देसाई, गुरुदत्त कामत, मेघेंद्र देसाई, प्रकाश गावडे, सतीश नाईक, सुशिल चमणकर, गजानन ‌ कुंभार, चंद्रशेखर मांजरेकर, संतोष राऊळ, ऑगस्टीन फर्नांडीस, प्रमोद राऊळ, सतिश नाईक, संतोष लवू राऊळ, रोहन परब, प्रमोद गोपाळ राऊळ, धर्माजी गावडे, सचिन जगन्नाथ कोंडये इत्यादी प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा