बांदा :
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० नुसार नवीन राज्य अभ्यासक्रम व पाठ्यक्रम यावर आधारित नवीन पाठ्यपुस्तके निर्मितीच्या व शैक्षणिक साहित्य निर्मितीच्या अनुषंगाने दर्जेदार पाठ्यपुस्तक निर्मितीसाठी मराठी विषय समितीवर मनोहर परब यांची सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे.
शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी सातत्याने नवोपक्रमशील शिक्षक असून ते जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बांदा पानवळ येथे कार्यरत आहेत. मुलांमध्ये वाचनाची गोडी निर्माण करून त्यांच्यातील कवी, लेखक जागृत करून विद्यार्थीनिर्मित ऊब काव्यसंग्रह, उमलते भावसंवेदन कथासंग्रह ,कोरोना लॉकडाऊन एक जीवनानुभव ललित गद्य अशी पुस्तके संपादित केली आहेत. तसेच प्रितगंध ,मधली सुट्टी, ट्रिंग ट्रिंग अशी साहित्य कृती प्रकाशित आहेत.तसेच विद्यार्थीचा सुर नवे या संगीत कार्यक्रमाची निवड होऊन रत्नागिरी आकाशवाणी केंद्रावर सादरीकरण झाले होते.महाराष्ट्र राज्य शिक्षणाची वारी या नवोपकमात त्यांची मार्गदर्शक म्हणून निवड झाली होती.
बेळगाव निलजी येथील साहित्य संमेलनाचे त्याने अध्यक्षपद भूषविले असून आकाशवाणी तसेच वर्तमानपत्र मासिकातून त्यानी साहित्य कृती मांडली आहे. सिंधुदुर्ग साहित्य संघाचे सचिव ,कोकण मराठी साहित्य परिषद सावंतवाडी सदस्य ,शिक्षक वाङमय चर्चा मंडळ सिंधुदुर्ग सचिव इत्यादी पदावर कार्यरत आहेत. अनेक शैक्षणिक प्रशिक्षणामध्ये विभाग आणी राज्यस्तरावर त्यानी मार्गदर्शक म्हणुन काम केले आहे.त्यांच्या या उत्कृष्ट कार्याची दखल घेऊन त्यांना अनेक सामाजिक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहेत .त्यांच्या या पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळाच्या निवडीबाबत त्यांचे अनेक स्तरातून कौतुक होत आहे.