You are currently viewing दुसर्यांना हसताना ….

दुसर्यांना हसताना ….

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्य ज्येष्ठ लेखिका कवयित्री अरुणा दुद्दलवार लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*दुसर्यांना हसताना…*

 

मनुष्याचा स्वभाव आहे

काढतो चुका इतरांच्या

स्वतः मधील उणीवा

झाकूनच ठेवायच्या….

 

त्यांना काय जमतं

जे मला नाही जमत

अभिमान तो बाळगावा

कौतुक करावं हसत….

 

प्रत्येकात दडलेले

वेगवेगळे असे गुण

काव्य,कला, नियोजन

आहे त्यांचीच खूण….

 

कोणी नीटनेटके

कोणी अष्टावधानी

शांत समंजस पणा

नसते कधी मनमानी….

 

काय जमतं आपल्याला

विचार करावा मनाशी

गुणांसाठी इतरांच्या

द्यावी पाठीवर शाब्बाशी….

 

सर्वगुणसंपन्नता

सगळ्यांमधे नसते

हसू नये कोणावर

आपल्यातही उणीव असते…

 

चांगलं घ्यावं छान बघावं

शिकावं इतरांकडून

आवडते व्हाल समाजात

हसू वापरा जपून……

 

➿➿➿➿➿➿➿➿

अरुणा दुद्दलवार @✍️

प्रतिक्रिया व्यक्त करा