You are currently viewing राष्ट्रीय काँग्रेसचे मेघनाथ धुरी यांची जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती

राष्ट्रीय काँग्रेसचे मेघनाथ धुरी यांची जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती

मालवण :

 

राष्ट्रीय काँग्रेसचे तालुकाध्यक्ष मेघनाथ धुरी यांच्या कार्याची दखल घेत काँग्रेसच्या जिल्हा उपाध्यक्षपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. काँग्रेस प्रांताध्यक्ष नाना पटोले यांच्या आदेशानुसार ही नियुक्ती करण्यात आली आहे.

राष्ट्रीय काँग्रेसची मालवण तालुकाध्यक्ष म्हणून मेघनाथ धुरी यांनी यशस्वीरीत्या कामकाज पाहिले. विविध आंदोलने करत त्यांनी ज्वलंत प्रश्नांवर आवाज उठविला. पक्ष संघटना वाढवण्यासाठी त्यांनी आपल्या सर्व सहकाऱ्यांना सोबत घेत प्रयत्न केल. त्यांच्या या कार्याशी दाखल घेत त्यांना बढती देत राष्ट्रीय काँग्रेसच्या जिल्हा उपाध्यक्षपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे त्यांच्या या निवडीबद्दल त्यांचे अभिनंदन होत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा