You are currently viewing कसाल येथे 18 लाखाची दारू जप्त, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कडक कारवाई

कसाल येथे 18 लाखाची दारू जप्त, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कडक कारवाई

कसाल येथे 18 लाखाची दारू जप्त, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कडक कारवाई

कुडाळ

राज्य उत्पादन शुल्क सिंधुदुर्ग चा भरारी पथकाने विधानसभा निवडणूक 2024 च्या आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर दिनांक 19/10/2024 रोजी पहाटेच्या सुमारास मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66, कसाल, ता. कुडाळ येथे संशयास्पद वाहनाची तपासणी केली. तपासणीदरम्यान, बोलेरो पीकअप चारचाकी वाहनातून गोवा बनावटीचे, गोवा राज्यात विक्रीसाठी असलेले मद्याचे एकूण 300 बॉक्स सापडले.

गोवा बनावटीचे मद्य 2700 बॉटल्स जप्त करण्यात आले, ज्याची अंदाजे किंमत ₹18,00,000 आहे. बोलेरो पीकअप चारचाकी वाहनाची किंमत ₹8,00,000 आहे. एकूण मुद्देमालाची किंमत ₹26,00,000 इतकी आहे.

सदर प्रकरणात एक गुन्हा नोंदवण्यात आला आहे. एक आरोपी असून अधिक तपास सुरू आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा