You are currently viewing हा महाराष्ट्र माझा”

हा महाराष्ट्र माझा”

“हा महाराष्ट्र माझा”
याचे भान जरा ठेवूया.. अॅड. नकुल पार्सेकर.
महाराष्ट्र विधानसभेच्या पंचवार्षिक निवडणूका जाहीर झाल्या. पाच वर्षे खर तर आपण फक्त महाराष्ट्रात तमाशा अनुभवला. मला जेव्हा पासून राजकारण समजायला लागलं तेव्हा पासून या पाच वर्षांत राजकारणाचा जो चिखल झाला एवढ्या खालच्या स्तराचं राजकारण यापूर्वी कधीही पाहिलं नाही, अनुभवल नाही.
साधारण अठरा वर्षे वय असताना सावंतवाडीत स्व. मधु दंडवते यांची भाषणं ऐकायचो.त्यानंतर अटलजींची भाषणं ऐकण्यासाठी पणजी, बेळगाव व त्यानंतर मुंबईलाही मुद्दाम जायचो. या नेत्यांकडे एक विचार होता. जो विचार समाज घडवणारा होता. निवडणूकीत सत्ताधारी पक्षाच्या ध्येयधोरणांवर टिका करण्याचा विरोधी पक्षाला जरुर हक्क आहे. सत्ताधारी व विरोधक ही संसदीय लोकशाहीची दोन चाकं आहेत पण गेल्या काही वर्षात ही चाकचं चिखलात रूतली.३६५ दिवस निवडणुकांच अतिशय घाणेरड राजकारण. २०१४ मध्ये या देशातील जनतेने मोठ्या अपेक्षेने परिवर्तन केले. मा. मोदी साहेबांच्या “ना खाऊंगा, न खाने दुंगा” या घोषणेचं जोरदार स्वागत झालं.. मा. मोदींनी स्वतः खाल्ल नाही पण ज्या काँग्रेस व इतर पक्षाच्या नेत्यांनी जनतेचा पैसा लुटला होता त्याना भाजपात घेऊन पावन करून घेतलं. जे सरळ मार्गाने आले नाहीत त्यांना तपास यंत्रणांचा वापर करून जेरबंद केलं… त्यापैकी अनेकजण ईडीने सबळ पुरावे न दिल्याने काही काळानंतर बाहेर आले.. आणि ही प्रक्रिया अजूनही सुरु आहे. चंद्राबाबू नायडूंने केंद्रातील सत्तेला दिलेला टेकू हा आवश्यक असल्याने दोन दिवसांपूर्वी ज्या प्रकरणात ईडीने आरोपपत्र ठेवून दोन महिने जेलमध्ये ठेवलं होत त्या चंद्राबाबूना त्याच ईडीने क्लिनचीट दिली. “क्लिनचीट ” हा नवीन पायंडा सुरू झालेला आहे.
घटना, कायदे, न्यायालयाचे आदेश, पारंपरिक संकेत हे सगळेच फाट्यावर मारून जो कारभार या महाराष्ट्राने पाहिला तो खरोखरच अक्षम्य आहे… पण अशावेळी आशेने व अपेक्षेने कुणाकडे पहाणार? फार वर्षापूर्वी जेष्ठ साहित्यिक स्व. विं. दा. करंदीकर यांनी “सब घोडे बारा टक्के ” ही कविता का लिहिली असेल? त्याच उत्तर आज मिळाल.
महाराष्ट्र, ( मोठ राष्ट्र) होय, सर्वाथाने मोठ राज्य, साहित्य, संशोधन, कला, क्रिडा, समाजकारण, संत परंपरा अशा एक ना अनेक क्षेत्रात वर्चस्व असलेला माझा महाराष्ट्र, देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्राची स्वार्थाने पछाडलेल्या राजकारण्यांनी अक्षरश: दशा केली.
आता निवडणूकिचे पडघम वाजले, पाच वर्षे आरोप- प्रत्यारोप, चारित्र्यहनन, सुड, फोडाफोडी, पळवापळवी, गद्दारी आणि न्यायालयीन खटले यात गुरफटून टाकलेला आमचा महाराष्ट्र आम्ही पाहिला. राजकारणाच्या गुन्हेगारीचा चढता आलेखही अनुभवत आहोत. प्रबोधन कारांच्या या महाराष्ट्रात राजकीय स्वार्थासाठी जातीच्या, धर्माच्या भिंती उभारल्यामुळे सामाजिक सौहार्द टिकणार की नाही? यावर प्रश्नचिन्ह आहे. जाणता राजे आणि रयतेचे राजे म्हणून ज्या महाराष्ट्राच्या अस्मितेचा आणि स्वाभिमानाचा भगवा अवघ्या विश्वात फडकवला त्या महारांचाचं आणि पवित्र भगव्याच्या नावाने गलिच्छ राजकारण सुरु आहे. फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा जपलेला हा महाराष्ट्र आज अंधारात चाचपडतो आहे. बेगडी हिंदुत्वाचे ठेकेदार सामाजिक सौहार्द बिघडवत आहे.
सत्तेतून गडगंज पैसा.. आणि त्याच पैशातून पुन्हा सत्ता हे द्रुष्टचक्र अव्याहतपणे सुरू आहे. निवडणूकीच्या तोंडावर बेडूक उड्या सुरु आहेत. सगळेच राजकीय पक्ष इलेक्टीव्ह मेरीटाईम विचार करत असल्याने पक्षातील प्रामाणिक सामान्य कार्यकर्ते सडले जातात. जो गुन्हेगार असेल, वाम मार्गाने जो गडगंज पैसा कमवत असेल आणि याच पैशातून कार्यकर्त्यांच्या झुंडी पोसत असेल, जो निवडणूकीत मतदाराना विकत घेत असेल आणि पक्षालाही निधी देत असेल त्याच्याच गळ्यात सगळेच राजकीय पक्ष उमेदवारीची माळ घालतात.
चाणक्य म्हणतात, चांगली माणसं राजकारणा पासून दुर रहातात म्हणून अशा लोका़चं फावतं.अनेकदा अशीही चर्चा काही बुद्धिजीवी करतात, की चांगल्या माणसानी मुख्य प्रवाहात येवून काम केल पाहिजे. हे सगळ तत्त्वज्ञान बोलण्यासाठी ठिक आहे. हा प्रवाहच एवढा गढूळ झालाय की तुम्ही कितीही तुरटी फिरवली तरी तो स्वच्छ होण्याची सुतराम शक्यता नाही. जेव्हा मा. सुरेश प्रभू सारखा माणूस अशा प्रवाहातून बाजूला जातो तेव्हा हे लक्षात घ्यायला पाहिजे राजकारणातील चांगल्या माणसांची व्याख्या पूर्णपणे बदललेली आहे… आणि महाराष्ट्रा पुरत बोलायचं झाल्यास या महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकांनी व विशेषतः सुज्ञ मतदारांनी हा महाराष्ट्र माझाच आहे याचं भान ठेवून निर्णय घेण ही सांधुसंताच्या, फुले, शाहू, आंबेडकरांच्या आणि छञपतींच्या महाराष्ट्राची गरज आहे…

______________________________
*संवाद मीडिया*

*सुयश इन्स्टिट्यूट ऑफ पॅरामेडिकल सायन्स कुडाळ* (c/o Suyash multispeciality hospital Kudal)

कॉलेज किंवा नोकरी सांभाळून करता येण्यासारखे कोर्सेस
https://sanwadmedia.com/149070/

🩸 *दहावी नंतरचे कोर्सेस :* 🩸

🔬 *CMLT* (Certificate Course In Medical Lab Technology)

🧑‍🦼 *CDT* (Certificate In Dialysis Technician)

🎞️ *CXRT* (Certificate In X-ray Technician)

✂️ *COTT* (Certificate In Operation Theatre Technician)

👓 *COT* (Certificate In Ophthalmic Technician)

🩸 *बारावी नंतरचे कोर्सेस* 🩸

🔬 *DMLT* (Diploma In Medical Lab Technician)

🧑‍🦼*DTT* (Diploma In Dialysis Technician)

🎞️ *DXRT* (Diploma In X-ray Technician)

✂️ *DOTT* (Diploma In Operation Theatre Technician)

👓 *DOT* (Diploma In Ophthalmic Technology)

🧬 *आमची वैशिष्टे* 🧬

💸 माफक फी (39000)*
📚 उच्चशिक्षित शिक्षक
🌡️ मोफत प्रात्यक्षिक अनुभव
🏥 हॉस्पिटल अटॅचमेंट
🧑‍🔬 १००% नोकरीची हमी
📜 मान्यता प्राप्त सर्टिफिकेट

📍 *आमचा पत्ता :* सुयश हॉस्पिटल, कुडाळ एस.टी. स्टँड समोर, कुडाळ, सिंधुदुर्ग

☎️ 02362 – 223452
☎️ 02362 – 221358
📲 9422436933

*जाहिरात लिंक*
———————————————-
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा