अतिवृष्टीने नुकसान झालेल्या भात पिकांचे तात्काळ पंचनामे करा…
जिल्हा शेतकरी संघटनेची मागणी; तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे निवेदन सादर…
वेंगुर्ले
सततच्या पडणाऱ्या परतीच्या पावसामुळे भातपिकाचे नुकसान होऊन शेतकरी दुहेरी संकटात सापडले आहेत. त्यामुळे शेतीचे तात्काळ पंचनामे करुन शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी व नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी जिल्हा शेतकरी छत्रपती शिवाजी महाराज सिंधुदुर्ग संघटनेच्या वतीने आज वेंगुर्ले तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
या निवेदनात असे म्हटले आहे की, गेले ७ ते ८ दिवस सततच्या पडणाऱ्या परतीच्या पावसामुळे भातपिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. त्यामुळे पिकांना खुटवा येण्याची शक्यता आहे. त्यामुळे जरी शासनाने विमा कवच आधार म्हणून दिलेले असले तरी कोणतेही निकष न लावता शेतकऱ्यांचे भात पिकांचे सरसकट पंचनामे करावे.
हे निवेदन संघटनेचे जिल्हा अध्यक्ष शामसुंदर राय, प्रीतम सावंत, अर्जुन नाईक, सुयोग नाईक, राजेश बेहेरे, संदीप देसाई या शेतकऱ्यांनी तालुका कृषी अधिकारी व वेंगुर्ले तहसीलदार यांना हे दिले आहे.