*वेंगुर्लेत भाजपा अनुसूचित जाती मोर्चाची तालुका कार्यकरणीची बैठक संपन्न*
वेंगुर्ले
वेंगुर्लेत भाजपा तालुका कार्यालयात अनुसूचित जाती मोर्चाची बैठक जिल्हा संयोजक नामदेव जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली .
यावेळी भाजपा वेंगुर्ले तालुका अध्यक्ष सुहास गवंडळकर यांनी जिल्हा संयोजक नामदेव जाधव यांचे व तालुका संयोजक बाळा मधुकर जाधव यांनी इतर सर्वांचे स्वागत केले .
यावेळी मार्गदर्शन करताना भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रसंन्ना उर्फ बाळु देसाई यांनी भाजपा मध्ये अनु. जाती मोर्चा हा महत्वाचा घटक असल्याचे सांगून , पंतप्रधान नरेंद्र मोदी व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मागास समाजातील घटकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विविध योजना राबविण्यात आल्याचे सांगीतले .
मोदींच्या नेतृत्वाखालील सरकार हे निःपक्षपाती सरकार आहे, सर्वांच्या सक्षमीकरणासाठी आणि सामाजिक न्यायावर नव्याने लक्ष केंद्रित करणारी धोरणे आखली जात आहेत . संसदेच्या सेंट्रल हाॅलसमोर श्रद्धांजली अर्पण करणे असो कि संविधाना समोर नतमस्तक होणे, संविधान दिन साजरा करणे असो कि सामाजिकदृष्ट्या वंचित घटकांचे प्रतिनिधित्व सक्षम करणे असो , सामाजिक न्याय हा मोदी सरकारने कृतीतून दाखवून दिला .
२०१५ च्या आधी ” २६ नोव्हेंबर ” हा कायदा दिवस म्हणुन ओळखला जात होता . मोदी सरकार ने हा दिवस ” संविधान दिन ” म्हणून साजरा करायला सुरुवात केली .योगायोगाने हा निर्णय डाॅ. आंबेडकरांच्या १२५ व्या जयंती वर्षांत घेण्यात आला . संविधान दिन हा सर्व नागरिकांना विनम्र पणे आठवण करुन देतो कि , त्यांनी केवळ संविधान वाचलेच नाही तर ते आचरणात आणले पाहिजे.या नाविन्यपूर्ण उपक्रमासाठी भारत सरकार आणि पंतप्रधान मोदींचे कौतुक केले पाहिजेत .
यावेळी भाजप जिल्हा चिटणीस चंद्रकांत जाधव व कणकवली विधानसभा संयोजक संतोष जाधव सर यांनी मार्गदर्शन केले . तसेच अनुसूचित जाती मोर्चा शहर अध्यक्ष पदी युवराज जाधव व महीला शहर अध्यक्ष पदी विशाखा जाधव यांची नियुक्ती करण्यात आली . तसेच तालुका उपाध्यक्ष पदी मधु नारायण माडकर ( आरवली ) यांची निवड करण्यात आली .
यावेळी भाजपा ता.सरचिटणीस प्रशांत खानोलकर व बाबली वायंगणकर , जि.का.का.सदस्य वसंत तांडेल , अणसुर सरपंच सत्यविजय गावडे , अनुसूचित जाती मोर्चाच्या जिल्हा महीला संयोजीका मठकर , जिल्हा सरचिटणीस गुरुप्रसाद चव्हाण , जि. कोषाध्यक्ष अनंत आसोलकर , सावंतवाडी विधा. संघटक महेश गणपत चव्हाण , पाल ग्रामपंचायत सदस्य सौ.स्नेहल पालकर , खानोली मा. सरपंच प्रणाली खानोलकर , स्वप्नील मठकर ( मठ ) , उमेश मठकर , मिलिंद मठकर , निकेत पालकर , दामोदर मठकर , देवदत्त चव्हाण ( आरवली ) , विष्णु अनंत दाभोलकर ( दाभोली ) इत्यादी अनुसूचित जाती मोर्चाचे कार्यकर्ते उपस्थित होते .
______________________________
*संवाद मीडिया*
*सुयश इन्स्टिट्यूट ऑफ पॅरामेडिकल सायन्स कुडाळ* (c/o Suyash multispeciality hospital Kudal)
कॉलेज किंवा नोकरी सांभाळून करता येण्यासारखे कोर्सेस
https://sanwadmedia.com/149070/
🩸 *दहावी नंतरचे कोर्सेस :* 🩸
🔬 *CMLT* (Certificate Course In Medical Lab Technology)
🧑🦼 *CDT* (Certificate In Dialysis Technician)
🎞️ *CXRT* (Certificate In X-ray Technician)
✂️ *COTT* (Certificate In Operation Theatre Technician)
👓 *COT* (Certificate In Ophthalmic Technician)
🩸 *बारावी नंतरचे कोर्सेस* 🩸
🔬 *DMLT* (Diploma In Medical Lab Technician)
🧑🦼*DTT* (Diploma In Dialysis Technician)
🎞️ *DXRT* (Diploma In X-ray Technician)
✂️ *DOTT* (Diploma In Operation Theatre Technician)
👓 *DOT* (Diploma In Ophthalmic Technology)
🧬 *आमची वैशिष्टे* 🧬
💸 माफक फी (39000)*
📚 उच्चशिक्षित शिक्षक
🌡️ मोफत प्रात्यक्षिक अनुभव
🏥 हॉस्पिटल अटॅचमेंट
🧑🔬 १००% नोकरीची हमी
📜 मान्यता प्राप्त सर्टिफिकेट
📍 *आमचा पत्ता :* सुयश हॉस्पिटल, कुडाळ एस.टी. स्टँड समोर, कुडाळ, सिंधुदुर्ग
☎️ 02362 – 223452
☎️ 02362 – 221358
📲 9422436933
*जाहिरात लिंक*
———————————————-
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*