You are currently viewing सहसंचालक दिलीप जगदाळे यांना IAS संवर्गात बढती

सहसंचालक दिलीप जगदाळे यांना IAS संवर्गात बढती

सहसंचालक दिलीप जगदाळे यांना IAS संवर्गात बढती

सावंतवाडी प्रांताधिकारी म्हणूनही होते कार्यरत

दोडामार्ग तालुका निर्मिती मध्ये व पहिल्या सिंधू महोत्सवात मोठे योगदान

सिंधुदुर्ग :

तळ कोकणात नव्वदीच्या दशकात सिंधुदुर्ग जिल्ह्यात देवगड तहसीलदार व सावंतवाडी प्रांताधिकारी (१९९९ते २००१)अशा विविध पदांवर यापूर्वी काम केलेले दिलीप जगदाळे यांना नुकतीच IAS पदावर बढती मिळाली आहे. दिलीप जगदाळे हे सध्या महाराष्ट्र शासनाचे शिक्षण सहसंचालक म्हणून कार्यरत आहेत. केंद्र शासनाचे मनुष्यबळ व प्रशिक्षण विभागातर्फे नुकतेच या बाबतचे गॅजेट राजपत्र जाहीर करण्यात आले आहे. त्याचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे सिंधुदूर्ग जिल्ह्यातील अनेक मान्यवरांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी तिलारी धरणग्रस्त प्रश्नात लक्ष देत त्यांना न्याय मिळवून दिला होता.

यावर्षी महाराष्ट्राच्या राज्य शासकीय नागरी सेवेतील तेवीस अधिकाऱ्यांना IAS संवर्गात पदोन्नती देण्यात आलेली आहे. यामध्ये श्री जगदाळे यांचाही समावेश आहे.जगदाळे यांनी त्यांचे दापोली व राहुरी कृषी विद्यापीठ , कर्मवीर पाटील मॅनॅजमेण्ट इन्स्टिटयूट सातारा, पुणे विद्यापीठ व सिम्बायोसिस विद्यापीठ येथून शिक्षण पूर्ण केले आहे.

त्यांनी यापूर्वी श्रीवर्धन व देवगड येथे तहसीलदार पदावर काम केले आहे. सावंतवाडी जि. सिंधुदुर्ग व पंढरपूर येथे त्यांनी प्रांताधिकारी म्हणून त्यांनी जबाबदारी निभावली आहे.पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीचे कार्यकारी पद त्यानी काही काळ भूषविले आहे. तेथे सर्वसामान्य भाविक व वारकरी यांचे प्राथमिक सोयीसुविधा व मंदिर अंतर्गत व्यवस्था यांचे विकासावर त्यांनी भर दिला होता. सावंतवाडी प्रांताधिकारी पदाच्या काळात दोडामार्ग या स्वतंत्र तालुक्याच्या निर्मितीसाठी त्यांनी विशेष प्रशासकीय योगदान दिले होते. पहिल्या सिंधू महोत्सवात महत्त्वपूर्ण योगदान दिले होते त्याचबरोबर तिलारी धरण प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसनासाठी सुद्धा स्थानिक नेतृत्वाच्या मदतीने काम केले होते. अपर जिल्हाधिकारी असताना त्यांनी सरदार सरोवर नंदुरबार, धुळे अपर जिल्हाधिकारी व बीड जात पडताळणी अध्यक्ष या पदांवर काम केले आहे. नंदुरबार येथील प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन व धुळे येथील कोविड काळात जगदाळे यांनी उल्लेखनीय कामगिरी केलीआहे. राज्याच्या विविध प्रांतातील ९ जिल्ह्यामध्ये एकूण ३३ वर्षे कामाचा प्रदीर्घ अनुभव त्यांचेकडे आहे. त्यांच्या या पदोन्नतीबद्दल शिक्षण आयुक्त सुरज मांढरे, शिक्षण संशोधन संचालक राहुल रेखावार, आदींनी नी त्यांचे अभिनंदन केले आहे.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा