You are currently viewing आनंदाचा करार …माझा शब्दांशी.!

आनंदाचा करार …माझा शब्दांशी.!

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचाचे सन्माननीय सदस्य कवी बाबा ठाकूर लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*आनंदाचा करार …माझा शब्दांशी.!*

अठ्ठावीसावे.!

 

विसर्ग विवेकी शब्दांचा

हिचं संवादाची भाषा

एकमेकाकडे बघून हसतो

मायमराठीची…ही..अभिजात दिशा

 

जे शब्द अजाणता..

बालपणी जीभेवर चढले

अमृतकालात अमृताहून गोड

पसायदान काळजांत शिरले..

 

आनंदाचा करार माझा…शब्दांशी

ईश्वरीअंश अंगात येतो

वहिवाट शिरस्त्यांना उंचावून

पूर्वजांची भाषा उंचावतो..

 

घट्ट लोभनीय ओढीने

उराशी कानामात्रा जपतो

दैववशातली एकएक खूण

लिखाणात माझ्या उतरवतो.

 

फुंकरिनं अलगद उघडला

निरागस शब्दांचा नखरा

दृष्ट लागताचं आशयाला

लपवला मीचं !शब्दांचा…चेहरा

 

करार माझा शब्दांशी

सदैव आनंदात ठेवीन

तुम्हांला ह्दयांत कोंडून

जन्मभर पहारा देईन…!!

 

बाबा ठाकूर धन्यवाद

प्रतिक्रिया व्यक्त करा