माजी आमदार परशुराम उपरकर यांनी आक्रमक भूमिका घेत आरटीओ कार्यालयात अधिकाऱ्यांना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हायवे संदर्भात व होत असलेल्या चुकीच्या वाहतुकीबाबत जाब विचारत केली प्रश्नांची सरबत्ती.
कार्यभार सुधारा माजी आमदार उपरकरांचा आरटीओ अधिकाऱ्यांना इशारा पंधरा दिवसांचा अल्टिमेटम…
तर हायवे अधिकारी पोलीस प्रशासन व आरटीओ ची संयुक्त बैठक लावून सर्व प्रश्न मार्गी लावू आरटीओ अधिकारी श्री काळे यांनी लेखी पत्र दिले.
सिंधुदुर्ग
हायवेवरील महत्त्वाचे फलक,ओव्हरलोड वाहतून ,लक्झरी बस ,मालवाहतूक,आपत्कालीन बोर्ड ,अपघातग्रस्त रस्ते याबाबत वारंवार लक्ष वेधूनही सिंधुदुर्ग आरटीओ विभागाने कोणतीही दखल न घेतल्याने आता शेवटचे पंधरा दिवस पुन्हा अल्टीमेटम दिला जात असून त्यानंतर योग्य तो निर्णय घेतला जाईल असा इशारा सिंधुदुर्ग प्रादेशिक परिवहन अधिकारी यांना माजी आमदार जीजी उपरकर यांनी दिला. यावेळी त्यांनी आक्रमक भूमिका घेतली.
सिंधुदुर्ग आरटीओ कार्यालयात गुरुवारी माजी आमदार जीजी उपरकर व सर्मथक यांची हायवेशी संबंधी प्रलंबीत प्रश्नांबाबत पुन्हा बैठक घेण्यात आली.मागिल बैठकीत पंधरा दिवसांचे अल्टीमेटम कारवाईसाठी परिवहन अधिकारी यांना देण्यात आला होता त्यानंतर काही प्रमाणात कारवाई झाली देखील मात्र पुन्हा त्याकडे दुर्लक्ष करण्यात आला. आंबोली,फोंडा घाटामध्ये ओव्हरलोड वाहतूक सुरुच आहे त्यामुळे अपघातही झाले.हायवेवर आपत्कालीन बोर्ड,रुग्णवाहिका,मदत नंबर फलक,हायवे दिशादर्शक फलक,लक्झरी बस मधुन बेकायदा होणारी मालवाहतूक ,हायवेच्या दुर्दशेमुळे ठेकेदारावर कारवाई करणे आदी अनेक मागण्या करुनही सिंधुदुर्ग आरटीओ विभागाने त्याकडे दुर्लक्ष केले असे उपरकर म्हणाले.तर हायवेचे अनेक प्रश्न आजही बाकी आहेत ठेकेदारावर कोणतीही कारवाई झालेली नाही.अवैध प्रवासी वाहतूक,ओव्हरलोड वाहतूक याकडे दुर्लक्ष केले जात आहे त्यामुळे पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घ्यावी लागेल असे त्यानी सांगितले. येत्या 15 दिवसांत योग्य ती कारवाई केली जावी हा शेवटचा अल्टीमेटम असून त्यानंतर पुढील पाउल उचलले जाईल. पुन्हा एकदा गाड्या अडवून अनधीकृत वाहतूक दाखवू असा इशारा जीजी उपरकर यांनी दिला.यावेळी आशिष सुभेदार,आप्पा मांजरेकर राजेश टंगसाळी बाळा बहिरे,नाना सावंत,सचिन मयेकर,विजय जांभळे,स्वप्नील जाधव मंदार नाईक आबा चिपकर रमेश शेळके बाबल घाटकर शिवा तानावडे आदींसह मा आमदार उपरकर समर्थक उपस्थित होते.यावेळी आरटीओ प्रादेशिक परिवहन विभागाकडून याप्रश्नी महामार्ग पोलीस, परिवहन अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभाग, हायवेचे अधिकारी यांची येत्या २३ रोजी बैठक आयोजित केली आहे त्यात याबाबत योग्य ती चर्चा केली जाईल सबंधित ठेकेदारावर योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे तर वेळ पडल्यास त्यांच्यावर गुन्हेही दाखल करू असे पत्राद्वारे कळवले आहे.