एमपीएससी टॉपर अभिषेक कासोदे यांचे मार्गदर्शन
अमरावती :
अमरावती जिल्हा परिषदेच्या कर्तव्यदक्ष मुख्य कार्यकारी अधिकारी व संपूर्ण भारतातून दहाव्या क्रमांकाचे आयएएस झालेल्या श्रीमती संगीता महापात्र यांच्या पुढाकाराने येत्या शनिवार दिनांक 19 नोव्हेंबरला सकाळी 11 वाजता अमरावती जिल्हा परिषदेच्या डॉ.पंजाबराव देशमुख सभागृहामध्ये एका विनामूल्य स्पर्धा परीक्षा कार्यशाळेचे आयोजन केले आहे. या कार्यशाळेला कुठल्याही प्रकारचे शुल्क नसून सर्व प्रकारचे विद्यार्थी या कार्यशाळेला उपस्थित राहू शकतात. या कार्यशाळेला एमपीएससी टॉपर व सध्या अमरावती विभागात तिवसा येथा बिडिओ म्हणून कार्यरत असणारे श्री अभिषेक कासोदे चाळीसगाव हे मुख्य मार्गदर्शक म्हणून विद्यार्थ्यांना संबोधित करणार आहेत. अमरावती जिल्ह्यातील मुले जास्तीत जास्त संख्येने स्पर्धा परीक्षेमध्ये यशस्वी व्हावेत यासाठी श्रीमती संजीता महापात्र यांनी या विनामूल्य उपक्रमाचे आयोजन केले आहे.यापूर्वी झालेल्या स्पर्धा परीक्षा कार्यशाळेत यावर्षी आयएएस झालेले श्री अमर राऊत सातारा यांनी विद्यार्थ्यांना दोन तास मार्गदर्शन केले होते. स्पर्धा परीक्षेसाठी विद्यार्थी तयार व्हावेत यासाठी स्वतः मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती संजीता महापात्र या स्वतः वेगवेगळ्या संस्थेमध्ये शाळांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा बाबत मार्गदर्शन करीत आहेत. या पूर्वी अमरावतीचे जिल्हाधिकारी श्री किरण गीते यांनी अशाच प्रकारचा उपक्रम अमरावतीच्या डॉक्टर पंजाबराव देशमुख आयएस अकादमीच्या मिशन आयएएस या उपक्रमा अंतर्गत चालविला होता. त्यानंतर या उपक्रमामध्ये खंड पडला होता .परंतु नवीन आलेल्या श्रीमती संजीता महापात्र यांनी पुढाकार घेऊन या उपक्रमाचे आयोजन केले आहे .दर महिन्याला दोन विनामूल्य स्पर्धा परीक्षा कार्यशाळा होणार असून यामध्ये वरिष्ठ आयएएस व एमपीएससी उत्तीर्ण झालेले अधिकारी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत .तसेच त्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे पण देणार आहेत .तरी स्पर्धा परीक्षेला बसू इच्छिणाऱ्या व बसणाऱ्या विद्यार्थ्यांनी या विनामूल्य स्पर्धा परीक्षेचा लाभ घ्यावा असे विनंती संयोजकातर्फे करण्यात आली आहे .
प्रकाशनार्थ – प्रा. डॉ. नरेशचंद्र काठोळे
संचालक डॉक्टर पंजाबराव देशमुख आयएएस अकादमी
अमरावती 9890967003