पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी हॉटेल गजाली चे काम आजच्या तरुण उद्योजकांना शिकण्यासारखे : आमदार नितेश राणे
वेंगुर्लेत हॉटेल गजालीच्या रौप्य महोत्सवी कार्यक्रमात उपस्थित राहून दिल्या शुभेच्छा…
वेंगुर्ले
स्थानिकांना अपेक्षित आणि पर्यटकांना रूचणारी सेवा दिली तर हॉटेल सारख्या पर्यटन व्यवसायातील स्वप्न सर्व संकटांवर मात करून आपण पूर्ण करू शकतो हे वेंगुर्ले येथे गजाली हॉटेल ने २५ वर्ष अविरत सेवा देऊन दाखवून दिल. शैलेश शिरसाट आणि हर्षवर्धन नेवगी या जोडीने पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी केलेले काम आजच्या तरुण उद्योजकांना शिकण्यासारखे आहे. माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी हा जिल्हा पर्यटन जिल्हा करून टाकलेलं पाऊल खऱ्या अर्थाने फायदेशीर ठरत आहे हे अशा कार्यक्रमातून दिसून येते असे गौरोदगार आमदार नितेश राणे यांनी वेंगुर्ले येथे बोलताना काढले.
हॉटेल गजालीच्या रौप्य महोत्सवी वर्षा निमित्त आयोजित कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार नितेश राणे यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाले. यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर गजाली हॉटेलचे मालक शैलेश शिरसाट, हर्षवर्धन नेवगी तसेच जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी, कॅप्टन नितीन धोंड, खतनाम गायक सलील कुलकर्णी, सारस्वत बँकेचे सुनील सौदागर, जिल्हा नियोजन समिती सदस्य सचिन वालावलकर, माजी नगराध्यक्ष दिलीप गिरप, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संजय पडते, मुख्याधिकारी परितोष कंकाळ, प्रणय तेली व अन्य मान्यवर उपस्थित होते.
यावेळी आमदार राणे यांच्यासह उपस्थित सर्वच मान्यवरांनी हॉटेल गजालीच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देत या हॉटेलच्या शाखा सर्व ठिकाणी सुरू होउदेत अशी आशा व्यक्त केली.
माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे यांनीही या हॉटेल च्या पुढील वाटचालीस ऑनलाईन आपल्या शुभेच्छा दिल्या. तसेच शिरसाट यांनी चालवलेले हे सेवा व्रत आणि वेंगुर्लेवासियांनी त्यांना दिलेली साथ याचेही कौतुक केले. यावेळी शिरसाट व नेवगी यांनी आपल्या पंचवीस वर्षातील कामाचा अनुभव सांगितला.
यावेळी गजाल गजालीची या टॅगलांईन खाली ख्यातनाम गायक व संगीतकार सलील कुलकर्णी यांचे “माझे जगणे होते गाणे..” ही संगीत मैफिल उशिरा पर्यंत रंगली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सीमा मराठे यांनी तर आभार शैलेश शिरसाट यांनी मानले.