*विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यावरच काही तथाकथित समाज पुढाऱ्यांना हाताशी धरून फसव्या घोषणा आणि अमिषा दाखवून भंडारी समाजाकडे मतांचा जोगवा मागण्याचे धंदे.*
*भंडारी समाजासाठी आपल्या मंत्रिपदाच्या कार्यकाळात आश्वासनां व्यतिरिक्त प्रत्यक्षात काय काम केलं ते समोरासमोर जाहीर करावे:- कुणाल किनळेकर यांचा सवाल.*
कुडाळ
केली पंधरा वर्षापासून विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यावरच आमदार तथा मंत्री दीपक केसरकर यांना सावंतवाडी मतदारसंघात असलेली भंडारी समाजाची मतांची ताकद लक्षात येते.आणि याचा फायदा निवडणुकीत मिळावा यासाठी कोणा एका आपल्या पक्षाच्या पदाधिकाऱ्याला समाज पुढारी म्हणून पुढे करत भंडारी समाज आपल्या दावणीला बांधल्याचे चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो. 2019 च्या तत्कालीन सिंधुदुर्ग पालकमंत्री पदाच्या कारकिर्दीत केसरकरांनी कुडाळ तहसीलदार परिसरात शासकीय जमिनीत आपल्या तत्कालीन शिवसेना पक्षातील पक्षातील काही भंडारी समाज्याच्या त्या वेळच्या पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन भंडारी समाज भवनासाठी जागेच्या केलेल्या पाहणी नाट्याच काय झालं हे जाहीर करावे.
माझी भंडारी महासंघाच्या जिल्हाध्यक्ष व जिल्हा कार्यकारणी पदाधिकारी यांच्याकडे विनंती वजा मागणी आहे की अशा पद्धतीने जो कोणी महासंघाच्या कार्यकारणीवर नसताना तसेच भंडारी समाजकार्यात आपले कोणतेही योगदान नसताना केवळ आपल्या राजकीय स्वार्थासाठी तसेच आपल्या नेत्यांना खुश करण्यासाठी समाजाची भूमिका चुकीच्या पद्धतीने ठरवत असेल, तर त्याला वेळीच आवर घालावा.