सावंतवाडी :
सरमळे गावचे ज्येष्ठ व्यक्तिमत्त्व आणि माजी सरपंच श्री.अर्जुन गुणाजी गावडे यांनी आज सौ.अर्चना घारे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला.
प्रवेश करते वेळी गावडे म्हणाले अर्चना ही आमची मुलगी आहे आणि तिचे आजचे तळागाळातील कार्य पहाता त्यांची वाटचाल ही खूप लोकांना प्रेरणा देणारी व महिलांना आदर्शदायी अशी आहे. त्या मुळे त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्यासाठी आपण कटिबद्ध राहून येत्या विधानसभेसाठी काम करेन.
यावेळी त्यांच्या समवेत श्री.रामदास सावंत, सावंतवाडी शहराध्यक्ष श्री.देवा टेमकर, नंदकिशोर साटेलकर, विनायक परब , सावंतवाडी विधान सभा युवक अध्यक्ष विवेक गवस व आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.