भंडारी समाजाचे मुंबईत भवन, वीस कोटींच्या निधीसह जागा उपलब्ध – रुपेश पावसकर
मुख्यमंत्र्यांसह दीपक केसरकरांचे मानले आभार…
कुडाळ
भंडारी समाजातील बांधवासाठी मुंबई येथे भंडारी भवन उभारण्यात येणार आहे. त्यासाठी आवश्यक असलेली जागा आणि २० कोटींचा निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे. अशी माहीती भंडारी समाज युवा बिग्रेड माजी जिल्हाध्यक्ष रुपेश पावसकर यांनी दिली. दरम्यान हा निधी उपलब्ध करुन दिल्याबद्दल त्यांनी मुख्यमंंत्री एकनाथ शिंदे आणि राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांचे आभार मानले आहेत.
नुकताच हा निधी प्राप्त झाला असून या कामाचा भूमीपुजन सोहळा नुकताच संपन्न झाला. यावेळी ऑनलाईन पध्दतीने मुख्यमंत्री शिंदे उपस्थित होते. गेली अनेक वर्षे भवनाची मागणी होती ती पूर्ण झाल्यामुळे त्याचा समाजातील लोकांना फायदा होणार आहे. यासाठी भंडारी समाजाचे नेते तथा महासंघाचे अध्यक्ष नवीनचंद्र बांदीवडेकर यांनी पाठपुरावा केला.