You are currently viewing नर्मदाआई महिला औद्योगिक सहकारी संस्थेच्या माध्यमातून दिवाळी प्रदर्शन व खरेदी महोत्सव १८,१९,२० ऑक्टोबर रोजी

नर्मदाआई महिला औद्योगिक सहकारी संस्थेच्या माध्यमातून दिवाळी प्रदर्शन व खरेदी महोत्सव १८,१९,२० ऑक्टोबर रोजी

नर्मदाआई महिला औद्योगिक सहकारी संस्थेच्या माध्यमातून दिवाळी प्रदर्शन व खरेदी महोत्सव १८,१९,२० ऑक्टोबर रोजी

कुडाळ

नर्मदाआई महिला औद्योगिक सहकारी संस्थेच्या माध्यमातून महिला सक्षमीकरण हा उद्देश घेऊन आम्ही सिंधुदुर्ग जिल्ह्यात कार्यरत आहेत. जिल्ह्यातील महिला व्यवसायिक- उद्योजिका यांना एकत्र सोबत घेऊन त्यांच्या उत्पादनांना मार्केट मिळवून देण्यासाठी व या माध्यमातून इतर महिलांनी प्रेरित होऊन उद्योगाच्या दिशेने पाऊल टाकण्यासाठी त्यांना आत्मविश्वास देत आत्मनिर्भर बनण्यासाठी आमची संस्था निरंतर कार्यरत आहे. यंदाचा दिवाळी प्रदर्शन व खरेदी महोत्सव १८,१९,२० आक्टोबर रोजी संपन्न होत आहे. याचं महोत्सवात नर्मदाआई संस्था राजमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांना एका वेगळ्या पद्धतीने आदरांजली अर्पण करत आहे.
२०२४ हे वर्ष आपण पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचे ३०० वी जयंती वर्ष साजरं करत आहोत, याच पार्श्वभूमीवर पुण्यश्लोक अहिल्याबाईंनी महिला सक्षमीकरासाठी केलेल्या कार्याला एक सन्मान पुर्वक आदरांजली एका वेगळ्या प्रकारे अर्पण करण्याचा संस्थेने संकल्प केला आहे.हा संकल्प करत असताना समाजातील सर्व महिलांना पण यात सहभागी करुन घेताना आपल्या पुढच्या पिढीपर्यंत आपल्या देशातील रणरागिणींचा जाज्वल्य इतिहास पोहोचविण्याचा नर्मदाआई संस्थेचा प्रयत्न आहे.
आपण यामधे समाजातील ज्या महिला, महिला सक्षमीकरणासाठी काम करतात व आर्थिक दृष्ट्या ग्रामीण भागातील वाडी-वाडीवरील महिलांपर्यंत जात त्यांना प्रवाहासोबत चालण्यासाठी सक्षमपणे साथ देतात अशा कुडाळ तालुक्यातील एकुण ३०० ( प्रत्येक गावातील ३ महिला) महिलांचा छोटासा सन्मान करण्याचा संकल्प नर्मदाआई संस्थेने केला आहे. यामधे समाजात महिलांसाठी काम करणाऱ्या इतरही संस्थांना सहभागी करुन घेण्याचा आमचा प्रयत्न आहे.तरी आपण सर्वांनी या आमच्या महोत्सवास आवर्जून भेट द्यावी हे आग्रहाचे निमंत्रण सौ.संध्या प्रसाद तेरसे अध्यक्ष नर्मदाआई महिला औद्योगिक सहकारी संस्था, कुडाळ, सिंधुदुर्ग. यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा