You are currently viewing एमआयटी एडीटी’ची मानसिक आरोग्यासाठी जनजागृती

एमआयटी एडीटी’ची मानसिक आरोग्यासाठी जनजागृती

*’एमआयटी एडीटी’ची मानसिक आरोग्यासाठी जनजागृती*
*विद्यार्थ्यांनी पथनाट्य व रॅलीच्या माध्यमातून दिला समाजाला सकारात्मक संदेश*

*पुणे:*

एमआयटी आर्ट, डिझाईन आणि टॅक्‍नॉलॉजी विद्यापीठ, विश्वराजबाग, पुणेच्या स्कूल ऑफ एज्युकेशन अँड रिसर्च व स्कूल ऑफ वेदिक सायन्सेस यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त ‘मानसिक आरोग्य सप्ताह’ साजरा करण्यात आला. या सप्ताहाच्या समारोपप्रसंगी विद्यार्थ्यांच्या वतीने ‘संवेदनशीलता – मानसिक आरोग्याची’ या विषयावर लोणी-काळभोर गावात रॅली काढून व पथनाट्याद्वारे जनजागृती करण्यात आली.

विद्यापीठातील ‘मॅनेट’ या इमारतीपासून या रॅलीला विद्यापीठाचे प्र.कुलगुरू प्रा. डाॅ.अनंत चक्रदेव व डाॅ.मोहित दुबे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून प्रारंभ करण्यात आला. यावेळी, स्कूल ऑफ एज्युकेशन अँड रिसर्चच्या प्रभारी प्राचार्या डॉ. प्रिया सिंग आणि स्कूल ऑफ वेदिक सायन्सेसच्या प्रभारी प्राचार्या डॉ. माधवी गोडबोले यांच्यासह दोन्ही स्कुलचे प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि शेकडो विद्यार्थी देखील उपस्थित होते.

ही रॅली लोणी-काळभोर गावात पोचल्यानंतर प्रा. पुष्पा आटोळे आणि डॉ. शशिकला यादव यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी मानसिक आरोग्यावर आधारित, ‘पिंजरे से मुक्ती’ हे अतिशय सुंदर पथनाट्य सादर केले. रॅलीच्या सांगते साठी लोणी-काळभोर गावच्या सरपंच सौ. सविताताई लांडगे यांनीही हजेरी लावून पथनाट्याचे तोंडभरून कौतुक करताना विद्यार्थ्यांचा उत्साह वाढविला. या रॅलीच्या व मानसिक आरोग्य सप्ताहाच्या यशस्वीतेसाठी समन्वयक डॉ. नीता म्हवान यांनी कष्ट घेतले. या कार्यक्रमासाठी विद्यापीठाचे कुलगुरू तथा कार्याध्यक्ष प्रा. डाॅ.मंगेश कराड, कार्यकारी संचालक डाॅ.सुनिता कराड, प्र. कुलगुरू डॉ. रामचंद्र पुजेरी, कुलसचिव डॉ. महेश चोपडे यांचे मार्गदर्शन लाभले.

प्रतिक्रिया व्यक्त करा