You are currently viewing आचऱ्यात दागिने चोरून चोरटे पसार…

आचऱ्यात दागिने चोरून चोरटे पसार…

आचऱ्यात दागिने चोरून चोरटे पसार…

आचरा

आचरा येथे एका सोन्याच्या दुकानात दागिने खरेदीच्या बहाण्याने आलेल्या दोघा चोरट्यांनी दुकानातील सुमारे दोन ते अडीज लाख किंमतीचे दागिने घेऊन पळ काढल्याची घटना घडली आहे. अनोळखी दोघे चोरटे हे दुचाकीवरून आले होते. अशी माहिती मिळाली असून चोरटे सीसीटीव्ही फुटेज मध्ये कैद झाले आहेत. त्याचे फोटो व्हायरल झाले आहेत. चोरटे मालवण दिशेने गेल्याची माहिती पुढे आली आहे.

या प्रकरणी तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया पोलीस ठाण्यात सुरु असल्याची माहिती आचरा येथील विजय कदम यांनी दिली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा