*सर्वांच्या प्रेमाने भारावून गेलोय! आपल्या माणसांचे आभार मानणार नाही, तुमचे ऋण माझ्यावर सदैव राहिलेलेच मला आवडेल!!*
*वाढदिवसाला शुभेच्छा दिलेल्या शेकडो मायमाऊली, युवावर्ग आणि नागरिकांच्या आपुलकीने विशाल परब भारावले!*
काल १५ ऑक्टोबर रोजी युवा उद्योजक तथा भाजपा युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष श्री.विशाल परब यांचा वाढदिवस. दरवर्षीप्रमाणे जल्लोषी उत्साहात हा वाढदिवस न करता अत्यंत साधेपणाने आणि फक्त जनहिताचे विविध कार्यक्रम राबवून त्यांचा वाढदिवस साजरा केला गेला. भारताचे जगद्विख्यात उद्योगपती श्री रतनजी टाटा यांचे निधन झाल्याने भारतात आठ दिवसांचा दुखवटा पाळण्यात आला होता. आपल्याला यशस्वी उद्योजक बनवण्यात श्री रतन जी टाटा यांची प्रेरणा फार मोठी आहे, टाटा उद्योग समूहाची आपण एकेकाळी संलग्न असल्याने रतन टाटांची स्वकमाईतून समाजातील सामान्य जनतेसाठी चाललेली धडपड माझ्यासाठी नेहमीच आदर्श राहिली असे सांगत श्री विशाल परब यांनी या वेळेचा आपला वाढदिवस जनहिताच्या कार्यक्रमाशिवाय अन्य कोणत्याही गोष्टींनी साजरा करणार नसल्याचे अगोदर स्पष्ट केले होते. त्यामुळे दरवर्षीच्या उत्साही जल्लोषी कार्यक्रमांना, पुष्पगुच्छ, जाहिराती, केक कापणे आदी गोष्टींचा त्यांनी जाणीवपूर्वक अव्हेर केला होता.
मात्र विशाल परब यांच्यावर प्रेम करणाऱ्या शेकडो तरुणांनी, मायमाऊलींनी त्यांना भेटण्यासाठी गर्दी केली होती. अनेक राजकीय नेत्यांनी व पदाधिकाऱ्यांनी त्यांना प्रत्यक्ष भेटून आणि फोनवरून शुभेच्छा व्यक्त केल्या. विशाल परब यांच्या कार्यालयात त्यांना शुभेच्छा देण्यासाठी अनेकांनी प्रचंड गर्दी केली होती. मतदार संघातील विविध कार्यक्रमांच्या दरम्यान शेकडो लोकांनी त्यांना भेटून शुभेच्छा दिल्या. या सर्वांची आपुलकी व प्रेम आपल्यासाठी अनमोल असल्याची भावना श्री विशाल परब यांनी व्यक्त केली असून ही सर्व माझ्या घरातल्या सारखी माणसे आहेत, त्यांचे आभार मानत मी परकेपणा करणार नाही. मला नेहमीच त्यांच्या ऋणात राहायला आवडेल असे श्री विशाल परब म्हणाले आहेत. येणाऱ्या काळात रतन टाटांच्या कार्याला अभिप्रेत असा भव्यदिव्य कार्यक्रम ज्यातून रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील आणि पूर्ण कोकणचे लक्ष वेधले जाईल तो सावंतवाडी मतदार संघासाठी आयोजित केला जाईल, युवा रोजगाराला आपले नेहमीच प्राधान्य राहील असेही विशाल परब म्हणाले आहेत.