You are currently viewing महामार्गावर नडगीवे घाटात ट्रेलर पलटी

महामार्गावर नडगीवे घाटात ट्रेलर पलटी

महामार्गावर नडगीवे घाटात ट्रेलर पलटी

एक ठार, एकजण जखमी

कणकवली

मुंबई -गोवा महामार्गांवर खारेपाटण लगतच्या नडगीवे बांबरवाडी घाटीत पहाटेच्या वेळी गोवा ते मुंबई असा जात असलेल्या ट्रेलर चा अपघात झाला. तीव्र वळणावर लोखंडी साहित्याने भरलेला टेलर वरील चालकाचा ताबा सुटल्याने टेलर हा दुभाजक वरून येत मुंबई ते गोवा जाणारा लेनवर येऊन पलटी झाला. या अपघातामध्ये एकजण ठार तर एक जखमी झाला आहे. त्यास पुढील उपचार करता उपजिल्हा रुग्णालय कणकवली येथे पाठविण्यात आलेले आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक राजकुमार मुंडे, पोलीस नाईक -माने, खारेपाटण दूरक्षेत्र चे पोलीस अंमलदार श्री.पराग मोहिते यांनी घटनास्थळावर जाऊन पाहणी केली व जेसीबीच्या साहाय्याने ने साहित्य बाजूस करून मयत याच्या अंगाची तपासणी केली. मयत हा राज्य- मध्य प्रदेश येथील असल्याचे समजते आहे. अपघाताचा अधिक तपास कणकवली पोलीस करीत आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा