*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री डॉ.शैलजा करोडे यांनी वाचन प्रेरणा दिनानिमित्त लिहिलेली अप्रतिम काव्यरचना*
*ग्रंथ आमचे गुरू* (अष्टाक्षरी)
———————
ग्रंथ ज्ञानाचे भांडार
खुले कवाड मनाचे
सन्मार्गाची शिकवण
हेचि गमक ग्रंथाचे
ज्ञानियाचा राजा सांगी
गीता भागवत जना
अभंगातूनीया तुका
करीतसे प्रबोधना
राम उलटे बोलूनी
पहा वाल्मिक घडला
गाथा महाभारताची
व्यास सांगती सकला
पराक्रम शिवबाचा
गाती शाहीर पोवाडा
एकनाथ देई रूप
जागृृृतीचे ते भारूडा
मूकनायकाची बोली
दीन दुःखिता जागवी
करूनीया प्रबोधन
अत्याचार ते थोपवी
ज्ञाने घडतो माणूस
कर्तव्याची होई जाण
सावित्रीच्या लेखणीने
केले स्त्रियांचे कल्याण
ग्रंथ असे खरे मित्र
ग्रंथ ते सखा सोबती
होता दिवंगत तुम्ही
ग्रंथातूनी मिळे किर्ती
—————————
डाॅ. शैलजा करोडे ©®
नेरूळ नवी मुंबई
मो.9764808391