*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य कवी गीतकार गायक संगीतकार अरूण गांगल यांनी वाचन प्रेरणा दिनाच्या निमित्ताने लिहिलेली अप्रतिम काव्यरचना*
*”नित्य वाचन”*
मनुष्याचे कुतूहल जागृत होते वाचनानं
सर्वांगीण विकासाचा पाया आहे नित्य वाचनIIधृII
पुस्तके देती जगाकडे बघण्याचा दृष्टिकोन
करावे वाचन रसग्रहण मनन चिंतन
निर्णय घेण्याची क्षमता वाढते वाचनानंII1II
नित्यनेमाने करावे हरप्रकारचे वाचन
मनाने व्हावे जागरूक सतर्क निवांत
शब्दसंग्रह वाढतो होतो ध्येयाने प्रेरितII2II
वाचनातून होते नव्या संकल्पनांचे ज्ञान
जगण्यातल्या अपूर्णत्वाचे शीकवे भान
पुस्तके परस्पर संवेदनांची निरपेक्ष मैत्रII3II
लिहिताना सूर्यप्रकाशासम येती ज्ञान किरण
अनंत कल्पनांचा प्रकाश पसरे शब्दांतून
भाषा समृद्ध होते वाचनाने वाटते प्रसन्नII4II
व्यापक औदार्य उमदेपण येते जीवनांत
अनुभवांतून सहज सुचते शहाणपण
वाचनाने माणूस होतो बौद्धिकदृष्ट्या समृद्धII5II
श्री अरुण गांगल कर्जत रायगड महाराष्ट्र.
पिन.410201.Cell.93731677.