– दांडेली, आरोसमध्ये गावभेट दौरा
बांदा
एक वर्ष झाले तुम्ही मुख्यमंत्री झालात, महाविकास नाही महाभकास आघाडी केली आणि कोकणाला काय दिले? चक्रिवादळ, अतिवृष्टीमध्ये शेतकऱ्यांनी केलेली शेती अक्षरशः आडवी झाली. नुकसान भरपाई पोटी तर शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसल्याचा आरोप, भाजपचे नेते, आमदार तथा माजी मंत्री आशिष शेलार यांनी केला.
दांडेली येथे गावभेट दौऱ्यात आमदार शेलार बोलत होते.
यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली, जिल्हा बँक संचालक अतुल काळसेकर, सावंतवाडी नगराध्यक्ष संजु परब, माजी शिक्षण व आरोग्य सभापती प्रमोद कामत, बांदा मंडळ तालुकाध्यक्ष महेश धुरी, सावंतवाडी उपसभापती शीतल राऊळ, बांदा सरपंच अक्रम खान, सावंतवाडी युवामोर्चा चिटणीस काका परब, दांडेली बुथ अध्यक्ष संदिप माणगावकर, मनसेचे अमित नाईक तसेच अमोल आरोसकर, सिद्धेश मालवणकर, देवेंद्र माणगावकर, राकेश दळवी, रसिक दळवी, दुर्गेश मोरजकर, कृष्णा पालयेकर, सुनिल परब आदी ग्रामस्थ व उमेदवार उपस्थित होते.
आमदार शेलार पुढे म्हणाले की, शेतकऱ्यांच्या हितासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठे निर्णय घेतले आहेत. आता थेट शेतकऱ्यांच्या खात्यात शेतकरी सन्मान म्हणजे दोन हजार रुपये जमा होतात. तसेच ग्रामपंचायतला सुद्धा थेट निधी जमा होतो. यापुढेही ग्रामपंचायतला कुठच्याही निधीची कमतरता भासल्यास आम्ही निधी देऊ असे आश्वासन आशिष शेलार यांनी ग्रामस्थांना दिले.
शिवसेनेच्या धमकीला भीक घालणार नाही
माजी आरोग्य व शिक्षण सभापती प्रमोद कामत, सावंतवाडी नगराध्यक्ष संजू परब, भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली, जिल्हा बँक संचालक अतुल काळसेकर यांनीही मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रसिक दळवी यांनी तर स्वागत अमोल आरोसकर यांनी केले. आभार स्वतः आमदार आशिष शेलार यांनी मानले.