शिंदखेडा:
दिनांक 14 ऑक्टोबर 2024 रोजी सकाळी, अजंदे बुद्रुक ता.शिंदखेडा जि. धुळे येथील दिनेश शरद पाटील व आकाश शरद पाटील, दोन्ही दुग्ध व्यवसाय करणाऱ्या बंधूंकडे परिवाराची सदस्य असल्या प्रमाणे असणाऱ्या गोमातेचे वृद्धापकाळाने निधन झाले.
परिवारातील एक सदस्यच गेल्याच्या दुःखद भावनेतून दोन्ही भावांनी आणि गावातील बहुसंख्य नागरिकांनी यथासांग हिंदू धर्म शास्त्रानुसार विधीवत पूजन करून बँड वाजंत्री सह अंत्यविधी पार पाडला.
हिंदू धर्मात गोमातेला असलेले अनन्यसाधारण महत्त्व आणि तिच्या प्रती असणारे प्रेम जिव्हाळा आणि मातृत्वाचा आदर असणारी भावना, हिंदू संस्कारात पिढ्यान पिढ्या रक्तात मुरलेली आणि भिणलेली आहे. हे दोन्ही बंधुनी आणि गावकऱ्यांनी आपल्या कृतीतून सिद्ध केले.
*कृष्ण वंदे जगद्गुरुम्*
🌷🌹🌷🌹🌷🌹🌷