You are currently viewing कृष्ण सखा जीवन सारथी

कृष्ण सखा जीवन सारथी

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच तथा साहित्य प्रेरणा कट्टा आजगावचे सन्मा.सदस्य कवी सोमा चंद्रकला चंद्रकांत गावडे लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*कृष्ण सखा जीवन सारथी*

 

वरुनी सावळा अंतरी अमृत लळा

असा कृष्ण सखा पहा दिव्यत्वे आगळा ||१||

 

बालपणी खेळे गोविंदराज सावळा

गोपाळाचा हा धुंद वेणू नाद वेगळा ||२||

 

रक्षक पालक शिक्षक असे आगळा

शांत चित्त चित्तचोर प्रिय हा सावळा ||३||

 

गोवर्धन पूजूनि विश्व पूजा आगळी

सत्यप्रिय धैर्यशील शांती ती वेगळी ||४||

 

दुष्टता छेदुनि सभ्य परम आगळा

रणांगणी वा संसारी नित्य हा वेगळा ||५||

 

स्वार मनावरी हा भक्तप्रिय सावळा

भक्तवत्सल असा मनवेगे पावला ||६||

 

कधी भक्तीसाठी रणांगणी हा निर्मळा

उपदेशी भगवद्गीता असा वेगळा ||७||

 

जीवना अर्थ दे सारथी सखा विरळा

मुखे गोपालकृष्ण मंत्र ये महा भला ||८||

 

भक्तीरत कुणी असे नित्य हा श्यामला

चरितार्थ चालवी कृष्ण आशीष भला ||९||

 

भगवद्गीता देते जगण्या अर्थ आगळा

ध्यानी मनी नामी जीवन सार्थी वेगळा ||१०||

 

कवी :- श्री सोमा चंद्रकला चंद्रकांत गावडे.

फणसखोल, आसोली, ता.- वेंगुर्ला,

जि.- सिंधुदुर्ग, राज्य – महाराष्ट्र.

प्रतिक्रिया व्यक्त करा