You are currently viewing घडी (मुक्तछंद )

घडी (मुक्तछंद )

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री डॉ.सौ.मानसी पाटील लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*घडी* (मुक्तछंद )

 

जाते विस्कटून

जेव्हा जगण्याची घडी…

मनातील विचारांची गर्दी

नेते दूर आनंद ….

नकारात्मक विचारांना

मिळते मनात स्थान

सारासार विवेकबुद्धी

जाते हरवून‌…

बसतात राग द्वेष मत्सर

भीती ठाण मांडून !

अनावश्यक विचारांची.

गर्दी देते मनास क्लेष ….

अस्थिरता वाट्याला येऊन

पदरी पडते निराशा

अशावेळी देतात

सकारात्मक विचार दिशा !

सावरते सकारात्मकता

भरकटलेलं‌ तारू

ध्यानधारणा करते

मन‌ समतोल अन् स्थिर…

आत्मविश्वासाने ध्येयाच्या

दिशेने होते वाटचाल सुरू!

विचारांच्या अनिर्बंध रहदारीतून

मन सहज काढते मार्ग…

मन मुक्त मोकळे करणे

असते आपल्याच हाती…

आवड निवड छंद जोपासत

मन‌‌ राहतं आनंदी!

अधूनमधून मनाच्या तळात डोकावणे

असते गरजेचे…

मनाचा तळ स्वच्छ ठेवून

आनंद समाधान गवसण्याचे!

********************

*©️®️ डॉ.सौ. मानसी पाटील*

प्रतिक्रिया व्यक्त करा