You are currently viewing “सागर लाटा”

“सागर लाटा”

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य कवी गीतकार गायक संगीतकार अरूण गांगल लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*”सागर लाटा”*

 

ज्ञानोबा सांगती विश्व पहावे भक्तीनं

सृष्टीमय रहावे शिकवे भागवत IIधृII

 

समुद्रावरील लाटा सदैव उफाळतात

भरती ओहोटी चालू राहे सदोदित

स्थित्यंतर पचवितो शांतपणे समुद्रII1II

 

झाकला जात नाही लाटांनी समुद्र

कल्लोळ माळा उसळती जरी जोरात

अथांग सागराची खोली आहे अगाधII2II

 

लाटांचा विलास आहे सागराचे वैभव

पाण्यावरती लाटांची क्रीडा आहे जगरूप

रत्नाकर आपल्या स्थानी राहे स्थितप्रज्ञII3II

 

एकरूप आहेत सागर लाटा लवण

न होई विभाजन दोन्ही रूप जाती विरून

अनुभूती अनुभवणं ईश्वराचे दर्शनII4II

 

श्री अरुण गांगल कर्जत रायगड महाराष्ट्र.

पिन.410201.Cell.9373811677.

प्रतिक्रिया व्यक्त करा