You are currently viewing सिंधुदुर्ग जिल्ह्यात विकास प्रकल्पांना का होतोय विरोध..?

सिंधुदुर्ग जिल्ह्यात विकास प्रकल्पांना का होतोय विरोध..?

विशेष संपादकीय……

*सिंधुदुर्ग जिल्ह्यात विकास प्रकल्पांना का होतोय विरोध..?*

*समृद्ध कोकणात ताज सारखे पर्यटन प्रकल्प स्वागतार्ह*

सिंधुदुर्ग जिल्हा आणि विकास प्रकल्प यांचं गणित आजपर्यंत जुळलेलं नाही. त्यामुळे “विकास प्रकल्प म्हणजे सिंधुदुर्गात विरोध” हे ठरलेलं आहे. आतापर्यंत सिंधुदुर्ग जिल्ह्यात येणारे प्रकल्प हे विनाशकारी प्रकल्प म्हणून स्थानिकांनी त्याला विरोध केला. सी वर्ल्ड सारखा जिल्ह्याच्या पर्यटनाला चालना देणारा प्रकल्प देखील सिंधुदुर्ग जिल्ह्यात विरोधामुळे बासनात गुंडाळावा लागला. परंतु या प्रकल्पांना विरोध का झाला यावर सखोल विचार केला तर स्थानिक लोकांच्या वडिलोपार्जित जमिनी शेती बागायती प्रकल्पांमुळे बाधित होत असल्याने बऱ्याचदा स्थानिकांनी विरोध केलेला दिसून येत आहे. सत्ताधाऱ्यांनी आणलेला प्रकल्प होऊ नये यासाठी विरोधक प्रयत्न करताना दिसून येतात परंतु, जिल्ह्याच्या विकासाचा विचार केला असता विनाशकारी प्रकल्पांना विरोध एकवेळ समजू शकतो पण ताज सारख्या पर्यटनाला चालना देणाऱ्या प्रकल्पाला विरोध होणे दुर्दैवी असून कोकणी लोकांनी त्याचं स्वागतच केलं पाहिजे होतं. असाच प्रत्येक विकास प्रकल्पाला विरोध होत राहिला तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील युवकांना जिल्ह्याच्या शेजारील गोवा राज्यात नोकरीला जाण्या वाचून पर्याय उरणार नाही.
जिल्ह्यातील राजकीय पक्षांची म्हणा अथवा नेत्यांची सिंधुदुर्ग जिल्ह्यात विकास करण्याची कुवत नाही हे म्हणणे योग्य आहे का..? काही अंशी याचे उत्तर होकारार्थी येईलही परंतु खोलात जाऊन विचार केला असता काही ठिकाणी विकासात्मक प्रकल्प आणण्याचा प्रयत्न होत असताना काही स्थानिक नेत्यांची महत्त्वाकांक्षा आड येत असल्याने स्थानिकांकडून आपल्या वडिलोपार्जित जमिनी ज्यावर कोकणी जनता पोट भरते त्या जमिनी प्रकल्पाखाली गेल्यावर आपल्यावर उपासमारीची वेळ येईल या भीतीने प्रकल्पांना विरोध होताना दिसतो. अनेकदा विकास प्रकल्पाची भूमिपूजन आदी कार्यक्रम करताना स्थानिकांना विचारात घेतले जात नाही किंवा तोंडावर आलेल्या निवडणुकामुळे घाईगडबडीत भूमिपूजन करून लोकांना अंधारात ठेवले जात असल्याने स्थानिकांचा लोकप्रतिनिधी, नेत्यांवरचा विश्वास उडतो आणि अखेरीस प्रकल्प रोखले जातात. अलीकडे निवडणुकीत उतरण्याची प्रत्येकाची मनीषा वाढत असल्याने एखाद्या संभाव्य उमेदवाराने विकास प्रकल्प आणला असता विरोधी उमेदवार त्या विकास प्रकल्पात बाधित होणाऱ्या स्थानिक जमीन मालकांना भडकवतो आणि प्रकल्पाला विरोध करण्यासाठी प्रवृत्त करतो. त्यामुळे कोकणातील विकास प्रकल्प हे केवळ कागदावरच राहतात आणि कोकणातील बेरोजगार युवक कामधंद्याच्या शोधासाठी पुणे, मुंबई, गोवा, कोल्हापूर आदी ठिकाणी स्थलांतरित होतात. परिणामी कोकणातील घरे ओस पडत असल्याचे चित्र सर्रास प्रत्येक गावात दिसत आहे.
वेंगुर्ला तालुक्यातील शिरोडा वेळागर येथे ताजचा पर्यटन प्रकल्प येत असल्याचे गेली काही वर्षे विविध वृत्तपत्रांमधून वाचायला मिळत होते. या प्रकल्पाला स्थानिकांनी मोठा असा विरोध केला नव्हता तर पर्यटन प्रकल्प आल्याने आपल्या भागाचा विकास होईल, स्थानिकांना नोकऱ्या मिळतील या आशेपोटी प्रकल्प होण्यास स्थानिकांनी सहमती दिली होती. परंतु वेळागर येतील सर्वे नंबर 39 हा ताज साठी अधिग्रहण केलेल्या भूभागातून वगळावा अशी मागणी स्थानिक वेळागरवाशीयांनी केली होती. त्यावर प्रशासनाकडून कोणतेही लेखी उत्तर न मिळाल्याने राजकारणी लोकांवर विश्वास कोण ठेवणार..? या असुरक्षित भावनेपोटी स्थानिक वेळागरवासीय एकवटले आणि त्यांनी पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांच्यासमोर सर्वे नंबर 39 हा प्रकल्प बाधित जमिनीतून वगळावा अशी मागणी लावून धरली. गिरीश महाजन यांनी आपल्यावर विश्वास ठेवा आपण तुमची एक इंचही जमीन चुकीच्या पद्धतीने घेणार नाही असे सांगितले असतानाही प्रकल्पग्रस्तांनी आपण तशा प्रकारची लेखी हमी द्या या बाबीवर ठाम राहिले. परंतु प्रकल्प जाहीर होऊन काही वर्षे लोटली असता एवढे दिवस प्रकल्पाला विरोध होत नव्हता आणि निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी प्रकल्पाचे भूमिपूजन करण्यासाठी नेतेमंडळी आली असता अचानक विरोध का झाला..? हे गुपित देखील शोधणे महत्त्वाचे आहे.. कारण स्थानिक भूमिपुत्रांना कोण्या झारीतील शुक्राचार्यने आपली महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी भडकावून विरोध करण्यास भाग पाडले असल्याची दाट शक्यता आहे.
गोव्याच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याचा विकास व्हावा, आणि जिल्ह्यातील तरुणाई जिल्ह्यातच राहावी, नोकरी उद्योगासाठी मोठ्या शहरांकडे स्थलांतरित होऊ नये, कोकणातील घरे माणसांविना केवळ दगड विटा अन् चिऱ्याची राहू नयेत अशी जर कोकणवासियांची इच्छा असेल तर ताज सारखे जागतिक दर्जाचे प्रयत्न प्रकल्प कोकणात होणे आवश्यक आहे त्यासाठी कोकणी जनतेने देखील पाठिंबा देणे योग्य ठरेल.

______________________________
*संवाद मीडिया*

*सुयश इन्स्टिट्यूट ऑफ पॅरामेडिकल सायन्स कुडाळ* (c/o Suyash multispeciality hospital Kudal)

कॉलेज किंवा नोकरी सांभाळून करता येण्यासारखे कोर्सेस
https://sanwadmedia.com/149070/

🩸 *दहावी नंतरचे कोर्सेस :* 🩸

🔬 *CMLT* (Certificate Course In Medical Lab Technology)

🧑‍🦼 *CDT* (Certificate In Dialysis Technician)

🎞️ *CXRT* (Certificate In X-ray Technician)

✂️ *COTT* (Certificate In Operation Theatre Technician)

👓 *COT* (Certificate In Ophthalmic Technician)

🩸 *बारावी नंतरचे कोर्सेस* 🩸

🔬 *DMLT* (Diploma In Medical Lab Technician)

🧑‍🦼*DTT* (Diploma In Dialysis Technician)

🎞️ *DXRT* (Diploma In X-ray Technician)

✂️ *DOTT* (Diploma In Operation Theatre Technician)

👓 *DOT* (Diploma In Ophthalmic Technology)

🧬 *आमची वैशिष्टे* 🧬

💸 माफक फी (39000)*
📚 उच्चशिक्षित शिक्षक
🌡️ मोफत प्रात्यक्षिक अनुभव
🏥 हॉस्पिटल अटॅचमेंट
🧑‍🔬 १००% नोकरीची हमी
📜 मान्यता प्राप्त सर्टिफिकेट

📍 *आमचा पत्ता :* सुयश हॉस्पिटल, कुडाळ एस.टी. स्टँड समोर, कुडाळ, सिंधुदुर्ग

☎️ 02362 – 223452
☎️ 02362 – 221358
📲 9422436933

*जाहिरात लिंक*
https://sanwadmedia.com/149070/
———————————————-
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा