विशालभाई परब यांच्या वाढदवसानिमित्त विविध जनहिताचे कार्यक्रमाचे आयोजन
वेंगुर्ले
भाजपा युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष विशालभाई परब यांनी आपला वाढदिवस स्व.रतन टाटा यांच्या पुण्य स्मृतीला अर्पण करत असल्याचे जाहीर केले आहे . त्यानुसार फक्त जनहिताचे कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत.
याच अनुशंगाने *मंगळवार दिनांक १५ ऑक्टोंबर रोजी सकाळी ११ – ३० वाजता वेंगुर्ले नगरपरिषदेला* आरोग्याच्या दृष्टिकोनातून फाॅग मशीन , जंतूनाशक फवारनी मशीन तसेच ओला व सुका कचरा गोळा करण्यासाठी टप हे साहित्य देण्याकरीता स्वत: विशालभाई परब हे *वेंगुर्ले नगरपरिषद* मध्ये येणार आहेत , तरी तालुक्यातील भाजपाच्या सर्व लोकप्रतिनिधी , पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित रहावे , अशी विनंती *भारतीय जनता पार्टी , वेंगुर्ला**विशालभाई मित्रमंडळ, वेंगुर्ले.* करण्यात आली आहे.