You are currently viewing गुंडा राज,वसुली सरकार कसे असते हे उध्दव ठाकरे यांच्या काळात पाहिले

गुंडा राज,वसुली सरकार कसे असते हे उध्दव ठाकरे यांच्या काळात पाहिले

गुंडा राज,वसुली सरकार कसे असते हे उध्दव ठाकरे यांच्या काळात पाहिले

*भाजप प्रवक्ते आमदार नितेश राणे यांची टीका

*मन्सुक हिरेन, दिशा सालियन प्रकरणातील आरोपी का पकडले

* राज्याच्या सरकार मध्ये तीन सिंघम आहेत म्हणूनच दोन आरोपी लागलेच अटक केले

कणकवली

गुंडा राज,वसुली सरकार कसे असते हे उध्दव ठाकरे यांच्या मुख्यमंत्री काळात पाहिले. मोक्का लागलेले आरोपी घेवून राऊत सारखे लोक पत्रकार परिषदेत बसायचे.तर उध्दव ठाकरे यांच्या महा विकास आघाडीच्या सरकार मध्ये मन्सुक हिरेन, दिशा सालियन अशा हत्या झाल्या. सचिन वाझे सारखे अधिकारी वसुली गँग चालवायचे. आता आमचे महा युती सरकार मध्ये तीन सिंघम राज्याच्या मंत्रिमंडळात आहेत म्हणूनच दोन आरोपी पकडले गेलेत.ठाकरे मुख्यमंत्री असताना मन्सूक हिंरेन चे आरोपी का पकडले गेले नाहीत. दिशा सालियान चे आरोपी जेल मध्ये का गेले नाहीत असा सवाल भाजप प्रवक्ते आमदार नितेश राणे यांनी केला.
आमदार नितेश राणे यांनी कणकवलीत पत्रकारांशी बोलताना ठाकरे यांचा समाचार घेतला.ते म्हणाले ठाकरे सरकार मध्ये संजय राऊत सारख्या शक्ती कपूर कडून महिला सुरक्षित नव्हत्या आणि आता आम्हाला लेक्चर देत आहेत.तुझ्या मालकाच्या घरात गुंडाच्या टोळ्या आहेत. काही टिळक नगर मधील टोळ्या आणि काही दाऊद गँगचे पण आहेत त्यांची नाव आम्ही द्यायची का ? असा सवाल केला.सर्वात मोठा गुंडाचा लीडर मोतोश्रीच्या तिसऱ्या मजल्यावर बसलेला आहे.आम्हाला तोंड उघडायला लावू नका तुमचं वस्त्रहारण करु असा इशारा दिला.
अजून असंख्य गुन्हे आहेत ज्यात गोळ्या घालणे गरजेचे होते पाटकर प्रकरणात गोळ्या घालायच्या का असा सवालही केला.गुजरात चा खरां ब्रँड अंब्यासीटर उद्धव ठाकरे आहे.त्यामुळे संजय राऊत ने बोलण्या पूर्वी मालकाला बोलून दाखव, तुझा मालक आणि त्याचा मुलगा गुजराती कार्यक्रमाला नाच्या सारखे नाचत असतात.स्वतः पनवती असलेल्या लोकांनी इतरांवर टीका करू नये. कितीही बोंबलात तरी देवा भाऊ काय आहे हे जनतेला माहित आहे.माता बहिणींनी देवा भाऊ वर विश्वास ठेवला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा